Two wheeler
Two wheeler esakal
विज्ञान-तंत्र

Bike Tips : Two Wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

Two wheeler Key : नवीन दुचाकी घेतली की, त्यासोबत मिळणाऱ्या चावीला एक अल्युमिनियमची एक छोटीसी चीप येते त्यावर एक 5 आकडी क्रमांक असतो. ती चीप कशासाठी असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

एवढीशी दिसणारी ती चीप फार महत्वाची असते. म्हणून ती जपून ठेवणे गरजेचे आहे. ती जी चीप असते, त्यावरचा नंबर हा त्या किल्लीचा अनुक्रमांक असतो, किल्ली बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक किल्ली दुसर्‍या कुलूपाला लागत नाही.

चीप जपून का ठेवावी?

गाड्यांसाठी कुलूप आणि किल्ल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात बनवल्या जातात. परंतु प्रत्येक सेट गाडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा असावा लागतो, यासाठी कॉम्प्युटर प्रोग्राम असतात, आणि त्याला ओळखण्यासाठी तो अनुक्रमांक दिलेला असतो.

जर तुमची किल्ली हरवली, तुटली तर या क्रमांकावरुन नवीन किल्ली बनवता येते म्हणुन ही चीप जपुन ठेवणे चांगले

क्रमांक किती आकडी असतात

  • यातला क्रमांक कितीही आकडी असु शकतो, उदाहरणार्थ पाच आकडी क्रमांकाचे साधारण ८० हजार कॉम्बिशन बनवतात, त्यानंतर हा क्रमांक परत येऊ शकतो.

  • सहा आकडी क्रमांकामधे ही शक्यता आठ लाख असते, त्यानंतर पुनरावृत्ती होऊ शकते.

  • सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कॉम्बिशन्स टाळले जातात, उदाहरणार्थ १००००० सारख्या नंबरचा प्रोग्राम, हे कुलुप एखाद्या तारेने सुध्दा सहज उघडले जावु शकते.

  • ही व्यवस्था दोन्ही म्हणजे फक्त किल्ली असलेल्या वहानांसाठी आणि electronic lock असलेल्या वहानांसाठी थोड्याफार फरकाने सारखीच असते

  • ग्राहकाच्या सोयीसाठी एका गाडीतील सर्व प्रकारच्या कुलपांसाठी एक समान किल्ली दिली जाते.

  • आत्ताच्या काळात वहानाच्या सुरक्षिततेसाठी याच्या किल्लीबरोबर चिप न देता बारकोड दिला जातो

  • कंपनीत गाडी जेंव्हा Offline होते तेंव्हा हा बारकोड स्कॅन करुन सिस्टिममधे सेव्ह केला जातो, तो बिलावर पण लिहीला जातो.

  • किल्ली हरवली तरी या क्रमांकावरुन परत त्याच गाडीची किल्ली सहजपणे बनवून मिळू शकते, अनुक्रमांक माहित नसेल - स्टिकर / चिप हरवली तरी चॅसिस नंबरवरुन त्या गाडीला कुठल्या अनुक्रमांकाची किल्ली लागेल हे पण सहज समजू शकते

  • गाडीच्या इन्शुरन्स क्लेम, चोरी इत्यादी महत्वाच्या प्रसंगी हे रेकॉर्ड कंपनीकडून मागवता येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT