NPCI introduces a new feature allowing UPI payments without entering a PIN — coming soon to Google Pay, PhonePe, and Paytm for faster, seamless transactions.

 

esakal

विज्ञान-तंत्र

UPI Payments Without PIN: आता विना PIN देखील होईल UPI पेमेंट! ; लवकरच Google Pay, PhonePe, Paytm ॲपवर येतय खास फिचर

How Will UPI Payments Work Without a PIN? : जाणून घ्या, अगदी सोप्या स्टेप्सचा अवलंब करून तुम्हीही कशाप्रकारे याचा वापर करू शकाल?

Mayur Ratnaparkhe

UPI payments without PIN feature to launch soon: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय रिझर्व्ह बँक(RBI)ने UPI यूजर्ससाठी नवीन फिचरची घोषणा केली आहे. यानुसार आता यूजर्सना यूपीआय पेमेंट करतेवेळी पिन नंबरची आवश्यकता नसेल. यूजर्स आपला चेहरा दाखवूनही यूपीआय पेमेंट करू शकेल. मात्र या फिचरद्वारे व्यवहार करण्यासाठी एक मर्यादा निश्चित केली गेली आहे. 

NPCI ने UPI यूजर्ससाठी बायोमॅट्रिक फिचरची घोषणा केली आहे. यासिवाय यूजर्स आपल्या स्मार्ट ग्लासेसचा वापर करूनही आता यूपीआय पेमेंट करू शकतील. हे दोन्ही फिचर यूजर्ससाठी यूपीआयला अधिक सुलभ करण्यासाठी तयार केले गेले आहेत. NPCIचे हे नवीन फिचरसाठी लवकरच Google Pay, PhonePe, Paytm सारख्या ॲपवर वापरले जाऊ शकेल. यामुळे यूजर्स पेमेंट करण्यासाठी पिन नंबर ऐवजी आपला चेहरा किंवा फिंगर प्रिंटचा वापर करू शकतील.

NPCI ने बायोमॅट्रिक फिचरसाठी यूपीआय पेमेंटची मर्यादा ५ हजार रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. म्हणजेच यूजर्स बायोमॅट्रिक व्हिरेफिकेशनचा वापर करून केवल पाच हजार रुपयांपर्यंत यूपीआय पेमेंट करू शकतील. या नव्या फिचरचा फायदा यूजर्सना छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी सध्य होईल. त्यांना प्रत्येकवेळी पेमेंट करताना पिन नंबर टाकण्याची आवश्यकता नसेल.

कशाप्रकारे काम करणार? –

-UPIचे हे नवीन फिचर लवकरच रोलआउट केले जाईल. फिचर रोलआउट झाल्यानंतर यूजर्सना Google Pay, PhonePe, Paytme सारख्या UPI ॲप्सना ओपन करावे लागेल.

-यानंतर पेमेंट करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा QR कोडच्या पर्यायावर जाल.

-यानंतर पेमेंट अमाउंट टाकावी लागेल, यानंतर ज्या बँकेतून पेमेंट करायचे आहे ती निवडावी.

-यानंतर UPI PIN टाकण्याचा पर्याय येतो. मात्र यूजर्सना येथे बायोमॅट्रिकचा पर्याय देखील दिसेल

-हा पर्याय निवडून चेहरा किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून यूजर्स UPI पेमेंट करू शकतील.

हे फिचर तुमच्या आधार कार्डचे बायोमॅट्रिक डिटेल्स सारख्या फेशिअल एक्सप्रेशन, रेटिना स्कॅन आणि फिंगरप्रिंटला पडताळण्याचे काम करेल. यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT