podcast on Twitter 
विज्ञान-तंत्र

Twitter वर पॉडकास्ट करू शकतात यूजर्स, लवकरच लॉन्च होणार फिचर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज काल पॉडकास्ट(Podcast) खूप ट्रेंडमध्ये आहे. आता ट्विटरवरही (Twitter) हे ऑडिओ फिचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ट्विटचे लाईव्ह ऑडिओ प्रोक्डक्ट spaces मागील दोन वर्षांमध्ये लोकप्रिय होत आहे हे पाहता आता कंपनीने आणखी एक ऑडिया फीचर लोकांना भेट देणार आहे. पण, अद्याप हे स्पष्ट करण्यात आले नाही की, ट्विटरचा पॉडकास्ट फिचर (Twitter podcast) हे स्वतंत्र फिचर असेल किं स्पेसचा ( spaces) विस्तारीत भाग असेल. रिवर्स इंजिनिअर जेन मांचून वांग याने या नव्या फीचरला स्पॉट केले आहे. त्यांनी याचा एक स्क्रीन शॉट देखील शेअर केला आहे.

समोर आलेल्या माहितीनसार नवीन फिचरचा स्क्रिनशॉट

रिवर्स इंजिनिअर जेन मांचुन वांग यांनी जो स्क्रिनशॉट शेअर केला आहे त्यामध्ये अॅपच्या बॉटम बार मेन्युमध्ये एक मायक्रोफोन आयकॉन दिसत आहे. यावर टॅप केल्यास यूजर्सला पॉडकास्ट पेजवर रिडायरेक्ट केले जाते. पण, नवीन फिचर कसे काम करू शकते याबाबत जेन यांनी जास्त माहिती दिलेली नाही. पॉडकास्ट टॅब सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होण्यासाठी अजून काही वेळ लागेल.

spaces सोबत जोडलेला असू शकतो टॅब

विशेष म्हणजे, क्लबहाऊस ऑडिओ अॅपच्या धर्तीवर ट्विटरने 2020 मध्ये स्पेस फिचर सादर केले होते. याला यूजर्सने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सोशल पॉडकास्ट प्लॅटफॉर्म ब्रेकरला अधिग्रहण केल्यानंतर ट्विटरने ऑडिओ आधारित आपल्या सेवांमध्ये काही बदल केले आहे. कंपनी पॉडकास्टला सपोर्ट करण्यासाठी क्रिएटर्सला कमाईची नवी संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर ऑडिओ अॅडस देखील याचा भाग होऊ शकतो.

रेकॉर्डिंगचा दिला पर्याय

थोड्या दिवसांपूर्वी ट्विटरने स्पेस फीचर नवीन अपडेट दिले होते. या अपडेटनुसार, मोबाईल यूजर्स चॅटरूम बनवून त्यामधील संवाद रेकॉर्ड केला जाऊ शकतो. अशा प्रकारे स्पेस सेशनला रेकॉर्डवर पॉडकास्टप्रमाणे ऐकू किंवा शेअर करू शकतो. हे रेकॉर्डिंग ३० दिवसांची दिसते. वेगळ्या पॉडकास्ट फिचरसह ट्वटिर स्पॉटिफाई किंवा अॅपल पॉडकास्टला टक्कर देऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

SCROLL FOR NEXT