virat kohli loses unboxed new smartphone in nagpur know how to recover phone and data rak94 
विज्ञान-तंत्र

Virat Kohli loses Phone : विराट कोहली प्रमाणे तुमचाही फोन चोरीला गेलाय? मग 'हे' एकदा वाचाच

सकाळ डिजिटल टीम

भारताचा फलंदाज विराट कोहलीचा फोनची सध्या सगळीकडं चर्चा होते आहे. नवीन मोबाईल फोन अचानक गायब झाल्याची माहिती विराटने ट्विट करत दिली आहे. यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार झाली नाही. तुमचा देखील फोन असाच गायब झाला किंवा गर्दीत चोरी झाला तर काय कराल?

या शिवाय चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन शोधणंही खूप कठीण आहे. मात्र, तुम्ही IMEI नंबरच्या मदतीने सरकारी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रीला (CEIR) भेट देऊन तुमचं डिव्हाइस म्हणजेच फोन ब्लॉक करू शकता. हा ऑप्शन सेफ आहे. याव्यतिरिक्त तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणखी काही उपाय करता येतील.

घरी बसून डेटा डिलीट करा

बहुतेक वेळा आपल्याला फोनच्या किंमती पेक्षा त्यात असलेल्या डेटाचे मुल्य जास्त असते. पर्सनल डेटा चुकीच्या हातात गेला तर मोठं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत, डेटा रिमोटली डिलीट करणे हा एक चांगला पर्याय आहे. अशा केसमध्ये, आयफोन युजर्स iCloud.com वर जाऊन डिव्हाइस डेटा हटवू शकतात. तर Android युजर्स android.com/find वर ​​जाऊन हा डेटा डिलीट करू शकतात.

तुमचा फोन ट्रॅक करा

Android च्या Find My Device आणि iPhone च्या Find My iPhone फीचरद्वारे फोन ट्रॅक करणं खूप सोपं झालंय. पण फोन ऑनलाइन असताना त्याचं लोकेशन फक्त तुम्हीच पाहू शकाल. त्याचप्रमाणे फोन बंद केल्यावर फोनचं शेवटचं लोकेशन युजर्सना दिसतं.

तुमची बँकिंग संबंधी माहितीचं काय?

तसं तर बँकिंग अॅप्समध्ये सिक्युरिटी पिन आणि लॉक असतो. पण तरीही, सावधगिरी म्हणून तुमचे पासवर्ड बदला. किंवा संबंधित बँकांना फोन करून व्यवहार थांबविण्याबाबत सांगा.

सोशल मीडियाचे पासवर्ड बदला

तुमचा फोन कोणाकडे आहे आणि ते त्याचं काय करतील सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे सोशल मीडिया पासवर्ड ताबडतोब बदला. अन्यथा कोणीही तुमच्या अकाऊंटवरून काहीही पोस्ट करू शकतो किंवा कोणालाही काहीही मॅसेज करू शकतो.

तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा

फोनमध्ये असलेल्या अकाउंटचे ओटीपी फक्त सिम कार्डवर येतात. अशा परिस्थितीत हे ओटीपी पासवर्ड चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास नुकसान होऊ शकतं. या प्रकरणात, नेटवर्क प्रोव्हाइडरला कॉल करा आणि शक्य तितक्या लवकर तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT