Vivo V50e Launch Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Vivo V50e Launch : दमदार Vivo V50e स्मार्टफोन लाँच; 50MP सेल्फी कॅमेरा आणि 90W फास्ट चार्जिंग, किंमत फक्त...

Vivo V50e Launch Price Features Details : विवोने भारतात V50e स्मार्टफोन लाँच केला असून यामध्ये 50MP सेल्फी कॅमेरा आणि 90W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. अधिक माहिती जाणून घ्या एका क्लिकवर..

Saisimran Ghashi

Vivo V50e Mobile Price : विवो कंपनीने त्यांच्या V सीरिजमधील नवीन मोबाईल Vivo V50e भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. अत्याधुनिक फीचर्सने भरलेला हा स्मार्टफोन फोटोग्राफी प्रेमींसाठी आणि पॉवर युजर्ससाठी एक एकदम बेस्ट पर्याय ठरू शकतो. 17 एप्रिलपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे.

डिझाईन आणि डिस्प्ले

Vivo V50e मध्ये 6.77 इंचांचा Full-HD+ क्वॉड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग, आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेस यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. डोळ्यांसाठी सुरक्षितता म्हणून SGS सर्टिफाइड लो ब्लू लाईट, HDR10+ सपोर्ट, आणि Diamond Shield Glass प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा सेटींग

Vivo V50e मध्ये मागील बाजूस 50MP Sony प्रायमरी सेन्सर असून त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. OIS (Optical Image Stabilization) आणि 116-डिग्री अँगल कव्हरेजमुळे फोटोंना प्रोफेशनल टच मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठीही 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो आकर्षक सेल्फीसाठी बेस्ट आहे.

प्रोसेसर, RAM आणि सॉफ्टवेअर

हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरवर चालतो, जो 4nm आर्किटेक्चरवर आधारित आहे. यात 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, यामध्ये Android 15 आधारित Funtouch OS 15 देण्यात आला आहे, जो तीन वर्षांपर्यंत मोठे OS अपडेट्स आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्सची हमी देतो.

बॅटरी आणि चार्जिंग

Vivo V50e मध्ये 5,600mAh ची दमदार बॅटरी असून ती 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अवघ्या काही मिनिटांत फोन चार्ज होतो आणि दिवसभर आरामात वापरता येतो.

इतर फीचर्स आणि डिझाईन

  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

  • IP68/IP69 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स

  • 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS, USB Type-C पोर्ट

फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात Pearl White आणि Sapphire Blue रंग आहे. याचे वजन 186 ग्रॅम असून डिझाईन अतिशय स्लीम आणि स्टायलिश आहे.

किंमत आणि उपलब्धता

  • 8GB + 128GB वेरिएंट – 28,999 रुपये

  • 8GB + 256GB वेरिएंट – 30,999 रुपये

    फोन Amazon, Flipkart आणि Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर 17 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

नवीन Vivo V50e हा एक प्रीमियम फीचर्सने परिपूर्ण स्मार्टफोन असून तो खास करून फोटोग्राफी, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Rohit Sharma ला रोज १० किमी पळवा, तो वयाच्या ४५ वर्षापर्यंत खेळू शकतो', वाचा कोण म्हणतंय असं

Solapur News: कृषी विभागाच्या योजना! शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; अनेक लाभार्थी लाभापासून वंचित

MP Praniti Shinde: हुकूमशाहीतून मुक्तीच्या लढाईत सहभागी व्हावे: खासदार प्रणिती शिंदे; काँग्रेसचे ‘कन्‍हैय्‍या’ स्‍टाईल आंदोलन

ना गोजिरवाण्या घरात ना होणार सून या मालिकेमुळे पहिल्यांदा मिळालेली तेजश्रीला प्रसिद्धी; छोटीशी भूमिकाही झालेली हिट !

Solapur: सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना बक्षिस; गौरीशंकर कोंडा यांची मोठी घोषणा, आज होणार चर्चासत्र

SCROLL FOR NEXT