Vivo Y400 Pro 5G Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Vivo Y400 Pro 5G भारतात लॉन्च; फक्त 10 हजारात सुपर स्मार्टफोन, दमदार फीचर्स पाहा एका क्लिकवर

Vivo Y400 Pro 5G Price Features : विवोने भारतात Vivo Y400 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून, 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह बजेटमध्ये दमदार पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हा फोन 10,499 पासून सुरू होतो आणि आकर्षक ऑफर्ससह फ्लिपकार्ट व इतर ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Saisimran Ghashi

Vivo Y400 Pro 5G Launch : विवोने आपल्या लोकप्रिय Y सीरिजमध्ये एक नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे Vivo Y400 Pro 5G. फक्त 10,499 च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणारा हा फोन, दमदार बॅटरी, शानदार कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीसह जबरदस्त फिचर्स घेऊन आला आहे. कमी किमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स हवे असणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक बेस्ट ऑफर आहे.

5500mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

Vivo Y400 Pro मध्ये 5500mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी दिवसभर सहज चालते. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला असून, तुम्हाला फोन चार्ज करताना जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही.

50MP कॅमेरा आणि AI फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून, सुंदर आणि चांगले फोटो मिळवता येतात. सेल्फीसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबत Google चं Circle-to-Search सारखं AI आधारित फीचरही यात आहे.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

  • 6.77 इंचाचा curved AMOLED डिस्प्ले

  • 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits ब्राइटनेस

  • MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर

  • 8GB RAM + 128GB/256GB स्टोरेजचे पर्याय

  • Funtouch OS 15 आधारित Android 15

तीन आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध

  • फ्री स्टाइल व्हाइट

  • फेसत गोल्ड

  • नेब्यूला पर्पल

IP65 रेटिंग

Vivo Y400 Pro मध्ये IP65 रेटिंग असून, हा फोन पावसात थोडासा भिजला तरी त्याच्यावर परिणाम होत नाही.

किंमत आणि उपलब्धता

  • 8GB + 128GB वेरिएंट - 24,999

  • 8GB + 256GB वेरिएंट – 26,999

  • खरेदीवेळी 2,500 पर्यंत बँक डिस्काउंट तसेच अन्य बँक ऑफर्समधून डिस्काउंट मिळतो ज्यामुळे हा मोबाईल एक्स्चेंजसह 10 हजारात खरेदी करता येईल

  • उपलब्धता- Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर, Flipkart, आणि इतर रिटेल स्टोअर्सवर

उपलब्ध कनेक्टिव्हिटी फीचर्स

  • ड्युअल 5G सिम कार्ड

  • ड्युअल-बँड Wi-Fi

  • Bluetooth

  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

जर तुम्हाला बजेटमध्ये आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेला 5G फोन हवा असेल, तर Vivo Y400 Pro ही संधी चुकवू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT