Vodafone-Idea sakal news
विज्ञान-तंत्र

Vi युजर्ससाठी खास ऑफर! आता फ्रीमध्ये घरपोच मिळणार VIP फोन नंबर

सकाळ डिजिटल टीम

वोडाफोन आइडिया (Vodafone Idea) ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर देत आहे. Vi त्यांच्या ग्राहकांसाठी त्यांच्या पसंतीचा प्रीमियम, फॅन्सी आणि कस्टमाइज्ड मोबाईल नंबर (Customized Mobile Number)ची फ्रीमध्ये घरपोच डिलिव्हरी मिळवण्याची संधी देत ​​आहे. Vi ग्राहक त्यांच्या लकी नंबर , जन्मतारीख किंवा त्यांच्या जीवनात विशेष महत्त्व असलेल्या इतर कोणतीही तारीख असलेला विशिष्ट क्रमांक निवडू शकतात.

प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहक या प्रीमियम क्रमांकांचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही प्रीमियम मोबाइल नंबरच्या लिस्टमधून त्यांचा पसंतीचा क्रमांक देखील निवडू शकतात. ही सेवा दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, सूरत आणि जयपूरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा पोस्टपेड आणि प्रीपेड अशा दोन्ही ग्राहकांना देण्यात येत आहे.

Vi वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइटवरून त्यांच्या नंबरची उपलब्धता तपासू शकतात. यासाठी वापरकर्त्यांना एक पिन कोड द्यावा लागेल. त्यानंतर ते यादीतून त्यांचा पसंतीचा क्रमांक निवडू शकतात. वापरकर्ते त्यांच्या पसंतीचा क्रमांक देखील एंटर करू शकतात. ऑर्डर देण्यासाठी त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता द्यावा लागेल. कंपनीचा दावा आहे की ग्राहकांना झिरो डिलिव्हरी चार्जसह नवीन सिम कार्ड दिले जाईल.

प्रोसेस काय आहे

  • यासाठी, तुम्हाला प्रथम कंपनीच्या वेबसाइट https://www.myvi.in/new-connection/choose-your-fancy-mobile-numbers या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • आता प्रीपेड आणि पोस्टपेड पैकी योग्य पर्याय निवडावा लागेल.

  • तुमचा पिन कोड आणि मोबाईल नंबर सारखे डिटेल्स एंटर करा

  • यानंतर व्हीआयपी मोबाईल नंबर निवडा. जर तुमच्या पसंतीचा क्रमांक यादीत नसेल, तर तुम्ही वाढदिवस, एनिव्हर्सरी किंवा लकी नंबर नंबर एटर करा तुमच्या समोर यादी दिसेल त्यापैकी एक नंबर तुम्ही निवडू शकता

हंगामा म्युझिकसोबत भागीदारी

Vi ने अलीकडेच हंगामा म्युझिकसोबत भागीदारी करून ग्राहकांसाठी आणखी एक सेवा सुरू केली आहे. या टाय-अपनुसार, Vi वापरकर्ते आता हंगामा प्रीमियमचे 6 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवू शकतात. हे सबस्क्रिप्शन ग्राहकांना हंगामा म्युझिकच्या संपूर्ण लायब्ररीमध्ये अॅड फ्री एक्सेस देईल. यात 20 भाषा आणि वेगवेगळे म्यीझिक दिले जाते.

प्लेलिस्ट, पॉडकास्ट आणि म्युझिक व्हिडिओ देखील हंगामा म्युझिकवर Vi अॅप वापरून डाउनलोड केले जाऊ शकतात. ही सेवा Vi नेटवर्कवरील पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच अॅप वरुन तुम्ही तुमचे आवडते गाणे कॉलर ट्यून म्हणून सेट करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT