How to Block Lost Mobile Phone esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Tips & Tricks : मोबाईल हरवल्यास लगेच असे करा ब्लॉक, कोणालाही वापरता येणार नाही, डिटेल्सही राहील सेफ

How to Block Lost Mobile Phone: तुमचा फोन हरवल्यास असा करा ट्रॅक

सकाळ डिजिटल टीम

How to Block Lost Mobile Phone : मोबाईल हा आपल्या रोजच्या जीवनातील असा एक अविभाज्य घटक बनलाय ज्याच्या वापराशिवाय आपली सगळी कामं अपूर्ण आहेत.

अशात जर मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर मोठं नुकसान होऊ शकतं. तुमची पर्सनल डिटेल्स स्कॅमर्सपर्यंतही पोहोचू शकते. तेव्हा अशा स्थितीत काय करावे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा फोन हरवल्यास सर्वप्रथम तुम्ही CEIR वेबसाइटला भेट द्यावी. इथे यूजर चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करू शकतो. एवढेच नाही तर तुमचा फोन परत मिळाल्यास तुम्ही मोबाईल अनब्लॉक देखील करू शकता. हे काम कसे करायचे ते आपण जाणून घेऊया.

How to Block Lost Mobile Phone

CEIR वेबसाइटवर चोरीला गेलेला किंवा हरवलेल्या फोनची तक्रार कशी करावी?

CEIR सेवा सर्व राज्यांमध्ये उपलब्ध आहे. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या स्मार्टफोनची तक्रार करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनमधील सिम कार्डचा मोबाइल नंबर, IMEI नंबर आणि मोबाइल पावती यासारख्या तपशीलांची आवश्यकता असेल.

याशिवाय, तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी लागेल कारण तुम्हाला फोन ब्लॉक करण्यासाठी स्मार्टफोन यूजरच्या डिटेल्ससह पोलिस तक्रारीची डिजिटल कॉपी देखील आवश्यक असेल.

जेव्हा तुम्ही CEIR वेबसाइटवर स्मार्टफोन ब्लॉक करता, तेव्हा तो केंद्रीय डेटाबेसवरील ब्लॉकलिस्टमध्ये जातो आणि तुमचा हरवलेला फोन ब्लॉक होतो. मग तुमचा कोणीही वापरू शकणार नाही. (Technology)

तुमचा फोन सापडला तर अनब्लॉक कसा करायचा?

तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन सापडला असल्यास, तुम्ही तो येथून अनब्लॉक देखील करू शकता. तुम्हाला हे फक्त CEIR वेबसाइटद्वारेच करावे लागेल.

यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट आयडी आणि मोबाईल नंबर यांसारखे डिटेल्स टाकावे लागतील आणि त्यानंतर फोन अनब्लॉक करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT