WhatsApp Communities eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Communities : आता इतरांना दिसणार नाही तुमचा मोबाईल नंबर; कम्युनिटीसाठी व्हॉट्सअ‍ॅपने आणलं नवीन फीचर!

आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यापासून खबरदारी घेत आलं आहे.

Sudesh

आपल्या यूजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर लाँच करत असतं. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप जगभरात प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच कम्युनिटीज हे फीचर लाँच केल्यानंतर, आता व्हॉट्सअ‍ॅप यात मोठं अपडेट देणार आहे.

आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यापासून खबरदारी घेत आलं आहे. यूजर्सच्या चॅटमधील डेटा अगदी आपल्याकडेही साठवून ठेवला जात नाही, असं व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यातच आता यूजर्सचा फोन नंबर अनोळखी व्यक्तींना मिळू नये, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फीचर लाँच करणार आहे.

WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'फोन नंबर प्रायव्हसी' नावाच्या फीचरची सध्या चाचणी करत आहे. यामुळे तुम्ही एखाद्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाला असाल, तरीही कम्युनिटीमधील इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसणार नाही. (WhatsApp new feature)

WhatsApp new feature

अगदी तुम्ही एखाद्या मेसेजला रिअ‍ॅक्शन दिली, तरीही तुमचा नंबर इतरांना दिसणार नाही. केवळ कम्युनिटीचे अ‍ॅडमिन आणि ज्यांनी तुमचा नंबर सेव्ह केला आहे, अशाच व्यक्तींना तुमचा नंबर दिसेल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, तुम्ही जर कम्युनिटी अ‍ॅडमिन असाल, तर तुमचा फोन नंबर सर्वांना दिसणार आहे.

यूजर्स पाठवणार रिक्वेस्ट

कम्युनिटीमधील एखाद्या सदस्याला तुमचा मोबाईल नंबर हवा असेल, तर ते तुम्हाला रिक्वेस्ट पाठवू शकतील. यानंतर त्या व्यक्तीसोबत नंबर शेअर करायचा किंवा नाही हा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल. यामुळे यूजर्स अधिक सुरक्षितपणे कम्युनिटींमध्ये सहभागी होऊ शकतील.

सध्या हे फीचर केवळ बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. मात्र, टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT