WhatsApp Channels Esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Channels : आता व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करता येणार स्वतःचं चॅनल; नवीन फीचर लाँच

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर ब्रॉडकास्ट मेसेजचं अपडेटेड स्वरूप आहे.

Sudesh

व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी आपल्या यूजर्सना नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देतं. यूजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा या उद्देशाने हे फीचर्स उपलब्ध करून देतात. यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅपने चॅनल्स हे फीचर लाँच केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा (WhatsApp new feature) फायदा कॉलेज, संस्था, क्लासेस आणि कंपन्यांना होणार आहे. या माध्यमातून तुम्ही स्वतःचं एक ब्रॉडकास्ट चॅनल सुरू करू शकता. एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने सुरू केलेलं असंच चॅनल तुम्ही फॉलो देखील करू शकता.

काय आहे हे फीचर?

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फीचर ब्रॉडकास्ट मेसेजचं अपडेटेड स्वरूप आहे. यासाठी 'अपडेट' नावाची वेगळी टॅब देण्यात येणार आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांचे स्टेटस आणि तुम्ही फॉलो करत असलेले चॅनल्स दिसतील.

तुमच्या आवडीनुसार करा फॉलो

या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॅनल्स फॉलो करू शकाल. एखादी स्पोर्ट्स टीम, स्थानिक अधिकारी, ट्यूशन क्लासेस किंवा अन्य गोष्टींविषयी तयार करण्यात आलेले चॅनल्स तुम्ही पाहू शकणार आहात. तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो केलं, तरीही त्याच्या अ‍ॅडमिनला किंवा अन्य फॉलोवर्सना तुमचा नंबर दिसणार नाही.

विशेष म्हणजे तुम्ही या माध्यमातून जगभरातील चॅनल्स फॉलो करू शकाल. तसेच, तुम्ही एखादे चॅनल तयार केले तर ते कुणाला पाहता येईल यावरही तुम्ही निर्बंध लावू शकता. सध्या चॅनल्समधील चॅट्स इन्क्रिप्टेड नसणार आहेत. मात्र याबद्दल विचार सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली.

सध्या हे फीचर केवळ कोलंबिया आणि सिंगापूर या देशांमध्ये लाँच केलं आहे. लवकरच भारत आणि इतर देशांमध्ये हे लाँच करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT