WhatsApp Sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Down: जगभरात व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प; व्हिडिओ पाठवण्यात अडचण, नेटकऱ्यांची ट्विटरवर तक्रार

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली आहे.

राहुल शेळके

WhatsApp Down: भारतासह जगातील अनेक देशांमध्ये व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि स्टेटस डाऊनलोड होत नाहीत. याशिवाय व्हिडिओ पाठवण्यातही अडचण येत आहे. व्हॉट्सअॅपच्या सेवेवर नाराज असल्याने लोक ट्विटरवर ट्विट करत आहेत.

DownDetector या वेबसाइटवरही व्हॉट्सअॅप डाऊनची माहिती देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप काम करत नसल्याच्या तक्रारी अनेक युजर्सनी केल्या आहेत. 16 एप्रिलपासून ही समस्या येत असल्याच्या तक्रारी वापरकर्ते करत आहेत.

व्हॉट्सअॅप चालवण्यात अडचण :

Downdetector च्या मते, 42 टक्के वापरकर्त्यांना अॅप चालवताना त्रास होत आहे. 41 टक्के वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या नोंदवल्या आहेत, तर 17 टक्के वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत.

व्हॉट्सअॅप यूजर्सनी आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील बहुतेक वापरकर्त्यांनी व्हिडिओ डाउनलोड होत नसल्याची तक्रार केली आहे. (WhatsApp Down Some users face issues while downloading videos)

व्हॉट्सअॅपने काय म्हटले?

व्हॉट्सअॅपने अद्याप आउटेज किंवा अॅप चालवण्यात आलेल्या समस्येवर काहीही सांगितलेले नाही. असेही होऊ शकते की ही समस्या फक्त व्हॉट्सअॅप बीटावर आहे.

कंपनी बीटा आवृत्तीवर नवीन व्हिडिओ मेसेज फिचर्सची चाचणी करत आहे. वापरकर्ते WhatsApp वेब किंवा WhatsApp डेस्कटॉपवरून व्हिडिओ डाउनलोड करू शकतात.

एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये डाउनलोड होत नाही. युजर पुढे म्हणाला की आज इंटरनेट कनेक्शन फास्ट आहे, तरीही मला आज ही समस्या भेडसावत आहे.

आणखी एका युजरने व्हॉट्सअॅप व्हिडिओ डाउनलोड होत नसल्याची तक्रार केली आहे. युजरने लिहिले की चॅट आणि स्टेटस दोन्हीचे व्हिडिओ डाउनलोड होत नाहीत.

एका यूजरने दावा केला आहे की, 14 एप्रिल रोजी व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये समस्या आहे. वापरकर्त्याने ते लवकर दुरुस्त करण्याची विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Buddhist Community : 'आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र'; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे आदेशात?

Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

Latest Marathi News Live Update : शाळांना १८ ऑक्टोबरपर्यंत सुटी, जनगणना कालावधीत वाढ; बारावी परीक्षेमुळेही निर्णय

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

SCROLL FOR NEXT