Whatsapp Group Voice Chat Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Feature : आता टायपिंगला म्हणा रामराम! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं धमाकेदार फीचर, वापरा एका क्लिकवर

Whatsapp Group Voice Chat Feature : व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप चॅटसाठी नवीन व्हॉईस चॅट फिचर सादर केले आहे.

Saisimran Ghashi

Whatsapp Group Voice Chat : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी संवाद अधिक सुलभ बनवण्यासाठी एक नावीन्यपूर्ण फिचर आणले आहे. आता ग्रुपमध्ये मजकूर टाइप करण्याची गरज नाही, कारण व्हॉट्सअ‍ॅपने नव्या ग्रुप व्हॉईस चॅट फिचरची घोषणा केली आहे ज्यामध्ये युजर्स थेट बोलून संवाद साधू शकतात

नवे 'ग्रुप व्हॉईस चॅट' हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर अगदी नवे पर्व सुरू करत आहे. याआधीपर्यंत ग्रुपमध्ये मोठी माहिती द्यायची असेल, तर मोठ्या प्रमाणावर मजकूर टाइप करावा लागायचा. पण आता हे फिचर वापरून युजर्स थेट ग्रुपमध्ये बोलून आपला संदेश पोहोचवू शकतात जणू काही व्हॉईस कॉल सुरू आहे, पण तो कॉल न करता..

या सुविधेची सुरुवात मोठ्या ग्रुपसाठी झाली असली, तरी आता हे फिचर सर्व प्रकारच्या ग्रुपसाठी अगदी २-४ जणांच्या छोट्या ग्रुपपासून १०० पेक्षा अधिक सदस्य असलेल्या मोठ्या ग्रुपपर्यंत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रुपच्या साइजची चिंता न करता कोणताही युजर थेट 'लाईव्ह व्हॉईस चॅट'मध्ये सहभागी होऊ शकतो.

व्हॉईस नोट्सपेक्षा वेगळं काय?

व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर टप्प्याटप्प्याने अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे जर तुमच्या अ‍ॅपमध्ये हे फिचर अजून आले नसेल तर थोडी वाट पाहा नवे अपडेट्स लवकरच येतील.

जरी व्हॉईस नोट्स ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे, तरी हे नविन व्हॉईस चॅट फिचर खूप वेगळं आहे. कारण यामध्ये युजर्स एकाचवेळी ‘लाईव्ह’ संवाद साधू शकतात म्हणजे व्हॉईस नोटप्रमाणे एकीकडून दुसरीकडे संदेश पाठवणे नाही, तर सर्वांनी थेट बोलत संवाद साधता येतो जणू ग्रुप कॉलच

या नव्या तंत्रज्ञानामुळे मित्रमंडळींशी मजेशीर गप्पा, ट्रिप प्लॅनिंग, ऑफिस मीटिंग्स किंवा घरगुती चर्चासुद्धा आता अधिक रीयल आणि सोप्या पद्धतीने होतील.
डिजिटल संवाद अधिक मानवी आणि प्रभावी करण्याच्या दिशेने व्हॉट्सअ‍ॅप सतत नवे प्रयोग करत आहे. 'ग्रुप व्हॉईस चॅट' हे फिचर केवळ संवाद सोपं करत नाही, तर एकत्रितपणाची भावना देखील वाढवते. आता चॅट करताना कीबोर्डपेक्षा आवाज अधिक महत्वाचा ठरणार आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

Latest Marathi News Live Update : 'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

योगिता सौरभपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा संसार मोडणार? नवऱ्यापासून राहतेय वेगळी; एकमेकांना अनफॉलोही केलं...

Dhule News : दिवाळीनंतर एसटीचा 'सुपरफास्ट' विक्रम! धुळे विभागातून पुणे-मुंबईसाठी एकाच दिवसात १०९ जादा बस रवाना

SCROLL FOR NEXT