Whatsapp Feature: esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Feature: व्हॉट्सॲपचं नवं फिचर माहिती होताच तुमचीही उडेल झोप, चक्क मॅसेज...

हे भन्नाट फिचर बघताच तुम्ही काही वेळासाठी विचारात पडाल

सकाळ डिजिटल टीम

व्हॉट्सअॅपमध्ये एकशेएक भन्नाट फिचर येत आहेत. ज्यामुळे युजर्स खुश आहेत. मात्र व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर बघाल तर तुम्हीही चक्रावून जाल. कारण व्हॉट्सअॅपमधील नव्या फिचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅपवरील मॅसेज एडिट होऊ शकणार आहेत. या फिचरला बीटा वर्जनमध्ये स्पॉट केल्या गेलं आहे. याच्या मदतीने तुम्हाला सेंड केलेले मॅसेज आता एडिट करणं शक्य होणार आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे व्हॉट्सअॅपचे अपकमींग फिचर डिटेल्स.

टेलिग्रामवर फार आधीपासूनच मॅसेज एडिट करता येतात. मात्र हे वर्जन कधीपर्यंत स्टेबल वर्जनमध्ये येईल याची शाश्वती अजून दिल्या गेलेली नाही. जाणून घ्या फिचरच्या डिटेल्स. आता व्हॉट्सअॅप मॅसेज चक्क एडिट करता येणार म्हटल्या याचा जेवढा उपयोग होईल तेवढाच दुरूपयोगही होण्याची शक्यता आहे. मात्र हे ते आता युजरच्या वापर करण्यावर अवलंबून असेल.

असं काम करेल Whatsapp Message Edit फिचर

व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट फिचरला WABetaInfo मध्ये स्पॉट केल्या गेलंय. तर मॅसेज एडिट करण्याचं फिचर Whatsapp v2.22.20.12 स्पॉट केल्या गेलंय. वेबसाईटला याचा एक स्क्रिनशॉटही शेअर केला गेलाय. ज्यामध्ये तुम्हाला त्याची डिटेल्स बघायला मिळेल. हे फिचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध नाही. मात्र कंपनीने अधिकृत वेबसाईटवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनंतर कंपनी येणाऱ्या फिचरवर काम करत असल्याचे स्पष्ट होते. अँड्रॉईड युजर्सला लवकरच हे फिचर उपलब्ध होणार आहे.

लेटेस्ट फिचर सोडता अनेक फिचर्सची केली जातेय टेस्ट

कुठलाही मॅसेज सेंड केल्यावर तो किती वेळात एडिट करता येईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅपच्या आणखी काही फिचर्सवर काम केलं जात असल्याचं कळतंय. सोबतच युजर्सला त्यांचं ऑनलाईन स्टेटस हाईड करण्याचंही ऑप्शनही मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT