WhatsApp Multi Account Switch eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Multi Account Switch : एकाच अ‍ॅपमध्ये वापरता येतील अनेक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स; येतंय सर्वांच्या कामाचं फीचर!

WhatsApp new Feature : सध्या काही बीटा यूजर्सकडे हे फीचर दिलं असून, लवकरच सर्व यूजर्ससाठी ते उपलब्ध करून देण्यात येईल.

Sudesh

Multiple WhatsApp Accounts : आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे दोन सिमकार्ड असतात. या दोन्ही नंबरचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरण्यासाठी मात्र यूजर्सना दोन वेगवेगळ्या अ‍ॅप्सची गरज भासते. यासाठी मग क्लोन अ‍ॅप, किंवा बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप वापरणं; किंवा मग सरळ दुसरा फोन जवळ बाळगणं हाच पर्याय असतो.

मात्र, आता यूजर्सना एकाच व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये अनेक अकाउंट्स वापरता येणार आहेत. त्याच अ‍ॅपमध्ये यूजर्स दुसऱ्या नंबरवर स्विच करू शकतील. अँड्रॉईडच्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.23.17.8 या अपडेटमध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. सध्या याची चाचणी सुरू आहे.

WABetaInfo या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाईट व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या नवीन फीचर्सवर लक्ष ठेऊन त्याबाबत माहिती देते. एकाच अ‍ॅपमध्ये अनेक अकाउंट वापरता येण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने मल्टी अकाउंट स्विच हे फीचर तयार केले आहे.

कसं वापरता येईल?

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या असलेल्या क्यूआर कोड बटणाच्या शेजारी एक नवीन आयकॉन यासाठी देण्यात येणार आहे. या आयकॉनवर क्लिक करुन तुम्ही नवीन अकाउंट अ‍ॅड करू शकाल. तुम्ही लॉगआऊट करत नाही, तोपर्यंत त्या डिव्हाईसमध्ये दोन्ही अकाउंट अ‍ॅक्टिव्ह राहतील.

या फीचरमुळे यूजर्सना पर्सनल चॅट्स, कामाचे चॅट्स आणि इतर गोष्टी एकाच अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या ठेवता येतील. या विविध अकाउंट्सचे नोटिफिकेशनही वेगवेगळे येतील. सध्या काही बीटा यूजर्सकडे हे फीचर दिलं असून, लवकरच सर्व यूजर्ससाठी ते उपलब्ध करून देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT