Whatsapp New Feature esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 4 गेमचेंजर फीचर्स एन्ट्री, पाहा एका क्लिकवर..

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटससाठी चार नवीन फीचर्स आणले असून यामुळे स्टेटस अधिक आकर्षक होणार आहे.

Saisimran Ghashi

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या स्टेटस विभागात मोठे बदल करत असून, युजर्ससाठी चार नवीन आणि इन्टरेक्टिव्ह फीचर्स आणत आहे. मेटा कंपनीच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मवर आता युजर्सना अधिक क्रिएटिव पद्धतीने स्वतःला व्यक्त करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच जाहीर केले की, युजर्सना आता त्यांच्या स्टेटसद्वारे संगीत, कोलाज, फोटो स्टिकर्स आणि Add Yours असे फीचर्स वापरता येणार आहेत. हे सर्व अपडेट्स हळूहळू जगभरातील युजर्सपर्यंत पोहोचणार आहेत

लेआउट फिचर

आता युजर्स एकाच स्टेटसमध्ये ६ फोटो निवडून त्यांचा आकर्षक कोलाज तयार करू शकतील. हे फोटो विविध शैलीत सजवता येणार असून, अ‍ॅपमधील एडिटिंग टूल्सच्या मदतीने ते अधिक सुंदर बनवता येतील. ट्रिपचे हायलाईट्स, खास क्षण किंवा रोजच्या आठवणी यांना एका ठिकाणी मांडण्याचा हा एक उत्तम पर्याय ठरेल.

म्युझिक स्टिकर्स

इन्स्टाग्रामप्रमाणेच आता व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्येही संगीत जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये युजर्स त्यांच्या आवडत्या गाण्याचा एक म्युझिक स्टिकर तयार करून फोटो किंवा सेल्फीवर लावू शकतील. त्यामुळे साधा फोटोही आता संगीतासोबत अधिक जिवंत आणि भावनात्मक दिसणार आहे.

फोटो स्टिकर्स

ही फिचर युजर्सना कोणताही फोटो कस्टम स्टिकरमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देते. हा स्टिकर कट, रिसाईज किंवा शेपमध्ये एडिट करता येईल. त्यामुळे तुमचा स्टेटस आता केवळ फोटो नसून एकदम क्रिएटिव बनणार आहे.

Add Yours

सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेले "Add Yours" हे फिचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही. यामध्ये युजर्स एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून त्यासोबत एक थीम देऊ शकतात जसे की "तुमचा फेव्हरेट कॉफी मोमेंट" किंवा "माझा जुना फोटो." त्यावर मित्रमंडळी आपले स्टेटस शेअर करत प्रतिसाद देऊ शकतात. यामुळे स्टेटस अधिक संवादात्मक आणि मजेशीर होणार आहे.

मेटा कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की, हे सर्व फिचर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन आणि प्रायव्हसी फोकस यामध्ये कोणतीही तडजोड न करता आणले जात आहेत. म्हणजेच, वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित राहीलच.

कधी मिळणार नवीन अपडेट्स?

हे चारही फीचर्स हळूहळू सगळ्या युजर्ससाठी उपलब्ध होतील. जर तुम्ही अजून हे अपडेट्स पाहिले नसतील, तर थोडा वेळ वाट पाहा किंवा व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन अपडेट करून पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

SCROLL FOR NEXT