Who is Shubhanshu Shukla International Space Station Journey esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla : लढाऊ वैमानिक ते अंतराळवीर! कोण आहेत भारताचे हिरो शुभांशु शुक्ला? थरारक प्रवास जाणून थक्क व्हाल..

Who is Shubhanshu Shukla : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Journey : भारतीय हवाई दलातील एक धाडसी आणि प्रतिभावान वैमानिक, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला 25 जून 2025 दुपारी 12 वाजता ड्रॅगन स्पेसक्राफ्ट मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) झेप घेणार आहेत. हे भारतासाठी केवळ एक अंतराळमिशन नाही, तर धाडस, वैज्ञानिक क्षमता आणि लष्करी प्रशिक्षणाच्या उत्कृष्टतेचं प्रतीक आहे. पण या अंतराळ मोहिमेच्या आधी शुभांशु शुक्ला कोण आहेत आणि त्यांचा थरारक प्रवास कसा आहे जाणून घ्या..

लढाऊ वैमानिक ते चाचणी वैमानिक

शुभांशु शुक्ला यांचा प्रवास 2006 साली एअर फोर्स अकॅडमी मधून सुरू झाला, जेव्हा एक तरुण कॅडेट विमानाच्या कॉकपिटमध्ये पहिल्यांदा बसला. तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की एक दिवस ते अशा उंचीवर झेप घेतील जिथे आकाशही मर्यादा वाटेल. त्यांच्या आत्मविश्वासाने, धाडसाने आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी अनेक प्रकारच्या विमानांमध्ये सहजपणे उड्डाण केलं.

एक उत्कृष्ट लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी शत्रूच्या संभाव्य धोके ओळखून विमानांची ताकद आणि कमजोरी शोधली. याच कौशल्याने त्यांना चाचणी वैमानिक (Test Pilot) म्हणून पुढील टप्प्यावर पोहोचवलं एक असे पद जे भारतीय हवाई दलात अत्यंत प्रतिष्ठेचा आणि कठीण मानला जातो.

चाचणी वैमानिक बनण्याचा कठीण मार्ग

IAF मध्ये चाचणी वैमानिक होण्यासाठी अत्यंत काटेकोर निवड प्रक्रिया असते. स्क्वॉड्रन लीडर रँक किंवा त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्ट ऑपरेशनल रेकॉर्ड आणि किमान 1500 तासांचे उड्डाण अनुभव असणे आवश्यक असते. शिवाय, स्वेच्छेने अर्ज करावा लागतो आणि वैद्यकीय दृष्ट्या A1G1 दर्जा असणं गरजेचं असतं.

निवड झाल्यानंतर, बेंगळुरूमधील ASTE (Aircraft and Systems Testing Establishment) येथे 48 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले जाते. यामध्ये तांत्रिक चाचण्या, सिम्युलेटर उड्डाण, विविध विमानांवर थेट उड्डाण करताना अहवाल तयार करणे, प्रणाली समजून घेणे यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो.

अंतराळवीर म्हणून पुढचा टप्पा

हवाई दलातील चाचणी वैमानिक म्हणून गाठलेल्या उंचीमुळे शुभांशु शुक्ला यांना भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी सर्वात योग्य उमेदवार मानण्यात आलं. ते आज ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळात झेप घेणार आहेत आणि हे करताना ते भारताचे दुसरे ्अंतराळवीर बनतील जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जात आहेत.

या मोहिमेसाठी त्यांना कठोर शारीरिक, मानसिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील परिस्थितीत निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि विविध यंत्रणांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी हीच त्यांची खरी ताकद आहे.

शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राला एक नवा आत्मविश्वास देतो. केवळ इस्रोच नव्हे, तर हवाई दल आणि संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक यशाचा तो परिपाक आहे. त्यांच्या झेपेमुळे लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल आणि भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या अवकाश नकाशावर चमकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT