Car Tips
Car Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Tips : कार चालवतांना अचानक क्लच अडकतोय? या टिप्स करतील १००% मदत...

Lina Joshi

Car Tips : गाडीच्या ए बी सी बद्दल तुम्ही ऐकलं असेलच, साधारण प्रत्येका व्यक्तीला याची माहिती असतेच, गाडी चालवताना बहुतेक वेळा पाय क्लच पेडलवर असतो, कोणतीही गाडी सुरु करुन पुढे नेण्यासाठी, गेअर बदलण्यासाठी हे क्लच फार महत्वाचे असते, कारचा हा पार्ट व्यवस्थित ठेवणे फार महत्वाचे आहे.

कार चालवताना, नेहमी लक्षात ठेवा की त्याच्या क्लच पेडलमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसे होत असेल तर ताबडतोब मेकॅनिककडून नेऊन आपली कार तपासा आणि ती दुरुस्त करा. या लेखात आम्ही तुम्हाला याच क्लच पेडलशी संबंधित काही मुद्दे सांगणार आहोत.

याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारचे क्लच पेडल योग्य स्थितीत आहे की नाही हे जाणून घेऊ शकाल. शिवाय, जर ते खूप घट्ट झाले असेल किंवा इतर काही समस्या असतील तर ते कसे दुरुस्त करावे हेही तुम्हाला कळेल.

या कारणांमुळे क्लच अडकते

अनेकदा लोक तक्रार करतात की त्यांच्या कारचे क्लच अडकला आहे. अशा स्थितीत गाडी चालवताना हवा तितका कॉन्फिडन्स येत नाही. क्लच पेडल जॅम का होते ते आम्ही तुम्हाला सांगतो. सोबतच ते कसे दुरुस्त करता येतील हे देखील कळेल.

१. खराब क्रॉस शाफ्ट:

ट्रान्समिशनच्या आत एक लीव्हर आहे ज्याला क्रॉस शाफ्ट म्हणतात. क्लच पेडलवर जे प्रेशर आपण आपल्या पायाने टाकतो ते प्रेशर हस्तांतरित करण्याचं काम हे क्रॉस शाफ्ट करत असते.

जेव्हा क्रॉस शाफ्ट खराब होते तेव्हा पेडल्स खाली ढकलणे कठीण होऊ शकते. यामुळे तुम्हाला क्लच प्रेस करण्यात अडचण येते.

२. खराब पिव्होट बॉल:

पिव्होट बॉल क्लच पेडलच्या सुरळीत ऑपरेशनसाठी बनविला जातो. जेव्हा तुम्ही कारमधील क्लच पेडलला खाली ढकलता तेव्हा पिव्होट बॉल त्याला शिफ्ट करण्यास मदत करतो.

पिव्होट बॉल कालांतराने खराब होऊ शकतात किंवा जीर्ण होऊ शकतात. जेव्हा हे घडते तेव्हा आपल्याला पेडल खाली ढकलण्यासाठी जास्त शक्ती लावावी लागते.

३. क्लच प्लेट अॅडजस्ट करणे:

जेव्हा तुम्ही क्लच मास्टर सिलेंडर किंवा फक्त क्लच बदलता तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत पेडल्स अॅडजस्ट करा. क्लच पेडलला दुरुस्तीची आवश्यकता असू शकते याची काळजी घ्या. जर तुम्हाला ते आधीच जरा चुकीचे वाटत असतील, तर कदाचित ते बदलणे गरजेचे आहे.

कडक क्लच पेडल कसे फिक्स करावे?

यापैकी काही गोष्टी तुम्ही स्वतःच दुरुस्त करु शकता. तुम्ही योग्य साधनांच्या मदतीने तुमच्या कारमधील क्लच पेडल केबल किंवा लिकेज दुरुस्त करु शकता.

त्याच वेळी, तुम्हाला मेकॅनिककडून काही काम करुन घ्यावे लागतील. जर तुम्हाला त्याचा क्रॉस शाफ्ट किंवा पिव्होट बॉल बदलायचा असेल तर तुम्हाला मेकॅनिकची मदत घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT