Rajdoot Bike Sakal
विज्ञान-तंत्र

Rajdoot Bike : अख्ख्या देशाला वेड लावणारी ऋषी कपूरची बॉबी गाडी का बंद झाली?

भारताच्या रस्त्यांच्या हिशेबाने या बाईकचं डिझाइन करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Rajdoot Bike : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राला स्पीड मिळाला होता. हा गाजण्याचा आणि गाजवण्याचा काळ होता. या काळात फक्त कारचा ट्रेंड वाढत होता असं नाही तर तरुणाईमध्ये बाईकची क्रेझ निर्माण व्हायला लागली होती. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मोजक्याच कंपन्या या ऑटोमोबाईल क्षेत्रात होत्या. आणि तेव्हाच्या बाईक्स कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर येझडी आणि रॉयल एनफिल्ड विदेशी कंपन्या भारतात जम बसवू पाहत होत्या.

या सगळ्यामध्ये अशीच एक विदेशी बाईक आली, जी लोकांना खूप आवडली. त्या काळातील मोठे अभिनेते आणि क्रिकेटर्स त्या बाईकवर स्वार व्हायचे आणि हवा करायचे. प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर असताना मात्र या बाईक कंपनीने आपला भारतातला गाशा गुंडाळला. पण नेमकं असं घडलं तरी काय? आणि ही बाईक नेमकी होती तरी कोणती?

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

तर आत्तापर्यंत तुम्ही ज्या बाईकविषयी वाचलं ती बाईक म्हणजे राजदूत. स्वातंत्र्यानंतरची काही वर्ष भारतात फास्ट बाईकचा म्हणावा तेवढा ट्रेंड नव्हता. दरम्यान पोलिश कंपनी असलेल्या एस्कॉर्ट ग्रुपने त्यांची SHL 11 पुन्हा डिझाइन करून भारतात लॉन्च केली आणि तिला नाव दिलं राजदूत. ही भारतातली तेव्हाची फास्टेस्ट बाईक होती. भारताच्या रस्त्यांच्या हिशेबाने या बाईकचं डिझाइन करण्यात आलं होतं.

मात्र सुरुवातीच्या काळात या बाइकला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. या बाईकचा टॉप स्पीड 150 kmph होता. ती अवघ्या 4 सेकंदात 0 ते 60 किमीचा वेग पकडायची.

बॉबीने बदललं बाईकचं नशीब...

1970 सालापर्यंत बाईकची होती नव्हती तेवढी विक्री सुद्धा कमी व्हायला लागली होती. पण 1973 मध्ये आलेल्या बॉबी या चित्रपटाने या बाईकचं नशीब पालटलं. हा चित्रपट खूप चालला आणि सोबतच बाईक सुद्धा. या चित्रपटात हिरो ऋषी कपूर राजदूत बाईकवर स्वार झाले होते. मग काय, तरूणांमध्येही या बाईकची क्रेझ वाढू लागली. अचानक या बाइकच्या विक्रीमध्ये वाढ झाली. यानंतर अनेक सिनेस्टार आणि क्रिकेटर्सनीही ही बाईक वापरण्यास सुरुवात केली.

प्रत्येक गावागावात राजदूतची क्रेझ...

आता विक्रीत वाढ झाली म्हटल्यावर कंपनीने काही काळ सुटकेचा नि:श्वास सोडला, पण काही वर्षांनी पुन्हा एकदा बाईकच्या विक्रीत घट येऊ लागली. यानंतर कंपनीने जुनं मॉडेल बंद करून नवीन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली. यासाठी एस्कॉर्ट ग्रुपने जपानच्या यामाहाशी करार केला. यानंतर दोन्ही कंपन्यांनी मिळून भारतीय कंडिशनच्या हिशोबाने नवीन बाईक लॉन्च केली. यात बरेच बदल करण्यात आले होते, त्यामुळे बाईकच्या किंमतीतही बदल झाला होता. यानंतर ही बाईक देशातील प्रत्येक गावात पोहोचली. खराब रस्त्यावरही ती सहज चालवता येत होती. भारत सरकारनेही काही बाईक विकत घेऊन वनविभागाला व वैद्यकीय विभागाला दिल्या होत्या.

या कारणामुळे बंद झाली बाईक

नव्वदच दशक येईपर्यंत पुन्हा एकदा बाईकच्या विक्रीत घट होऊ लागली, कारण या काळात अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. या कंपन्या स्वस्त आणि चांगल्या बाइक्स बनवत होत्या. रेसिंग बाईक असूनही, राजदूतमध्ये सेफ्टी फीचर्स नव्हते. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. लोकांमध्ये भीती पसरली आणि भारतातील राजदूताची लोकप्रियता कमी होत गेली. याशिवाय बाइकचे पार्ट्सही सहजासहजी मिळत नव्हते. शेवटी 1991 मध्ये कंपनीने या बाईकचं उत्पादन थांबवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT