Wi-Fi Tech Knowledge
Wi-Fi Tech Knowledge esakal
विज्ञान-तंत्र

Tech Knowledge: तुमचे वायफाय राउटर रात्रभर चालू असते का? आरोग्यासाठी आहे खूप हानिकारक

Lina Joshi

Benefits of having WiFi off At Night: आजकाल सगळ्यांच्याच घरात वायफाय (Wi-Fi) असतच. इंटरनेट हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चाललं आहे. असं कोणीच नाही ज्यांना इंटरनेट माहिती नाही किंवा ते इंटेरनेटचा वापर करत नाहीत. 

मुलांच्या शाळेसाठी, कॉलेजसाठी, अनेकांच वर्क फ्रॉम होम असतं, टीव्ही सुद्धा इंटरनेटने सुरु होतो अशात मोबाइल नेट पॅकपेक्षा वायफाय राउटर घेणं जास्त परवडत. मोबाइल नेटपॅकपेक्षा ब्रॉडबँड प्लॅनच्या किंमतीही इतक्या कमी झाल्या आहेत की प्रत्येकाला घरी WiFi स्थापित करणे चांगले वाटते. WiFi वरुन अमर्यादित डेटा (unlimited data) उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्फिंगमध्ये कोणताही अडथळा येत नाही.

फोनवर इंटरनेट वापरत असताना कधी कधी आपण डेटा बंद करतो, पण घरात बसवलेले वायफाय राऊटर नेहमीच सुरु असते. घरातील सर्व उपकरणे त्याच्याशी जोडलेली (connected) असतात. परंतु आपण वापरत नसताना रात्रीच्या वेळी वायफाय राउटर चालू ठेवणे कितपत योग्य आहे याचा कधी विचार केला आहे का? अनेकांना याबद्दल माहिती देखील नसेल पण याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल... 

वायफायचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे फार कमी लोकांना माहीत असेल. म्हणूनच जेव्हा ते काम करत नाही तेव्हा आपण ते बंद केलं पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा कोणीही इंटरनेट वापरत नाही हे उघड आहे. अशा परिस्थितीत आरोग्याची हानी टाळण्यासाठी राउटर बंद ठेवावे.

वायफाय राउटरचा धोका काय आहे?

- WiFi ला WLAN देखील म्हणतात आणि हे एक वायरलेस नेटवर्क आहे ज्यामध्ये किमान एक अँटेना इंटरनेट आणि लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या वायरलेस कम्युनिकेशन उपकरणांशी (wireless communication devices) जोडलेला असतो. वायफाय नेटवर्क इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी (EMFs) वापरतात.

- वायफायच्या जास्त संपर्कामुळे तुमची शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते. तसेच, यामुळे तुमच्या झोपेत समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे रात्रीच्या वेळी नॉरपेनेफ्रिनचा स्राव वाढण्याचा धोकाही असतो. याशिवाय धोकादायक बाब म्हणजे यामुळे अल्झायमरचा त्रास होण्याचा धोकाही असतो.

- इसाबेला गॉर्डन, स्लीप सायन्स कोच आणि स्लीप सोसायटीच्या सह-संस्थापक, रात्री तुमचे वाय-फाय बंद करण्याचा सल्ला देतात. याचे दोन फायदे आहेत - पहिले चांगले झोपेसाठी हे आवश्यक आहे आणि दुसरे तुमचे कनेक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हॅकिंगचा धोका कमी करण्यासाठी रात्री वायफाय बंद करणे शहाणपणाचे आहे.

- शिवाय रात्रीच्या वेळी वायफाय बंद ठेवल्याने तुम्हाला वीज बिल सुद्धा कमी येईल आणि विजेची बचत होईल.

तुमच्या वायफायची चोरी होते आहे का?

वाय-फाय चोरी होत आहे की नाही हे शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे राउटरवरील लाईट्स तपासणे. राऊटरवर एक लाईटअसतो जो इंटरनेट कनेक्टिव्हिटी, हार्डवेअर नेटवर्क कनेक्शन आणि इतर वायरलेस क्रियाकलाप दर्शवितो. आपल्याला वायफाय नेटवर्कवरून आपले सर्व डिव्हाइस डिस्कनेक्ट करावे लागेल आणि वायरलेस ऍक्टिव्हिटी दर्शविणारा प्रकाश चमकत आहे की नाही ते पहावे लागेल. जर लाईट लुकलुकत असेल तर आपले वायफाय कोणीतरी वापरत आहे.

वायफाय चोरी कशी थांबवायची (How to prevent Wi-Fi from Hackers):

सर्वप्रथम आपणास नेटवर्क संरक्षित कसे करावे हे सुरक्षा प्रोटोकॉल तपासणे आवश्यक आहे. हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, आपण डब्ल्यूईपी आणि डब्ल्यूपीए सारख्या जुन्या सुरक्षितता प्रोटोकॉल टाळत आहात आणि डब्ल्यूपीए २ एईएस सारखे आधुनिक प्रोटोकॉल वापरात आहात. 

आपल्याला Google शोधात प्रोटोकॉलबद्दल माहिती मिळेल. अशात आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागेल की, पासवर्ड सशक्तच वापरायचा आहे. या व्यतिरिक्त, वाय-फाय ची चोरी टाळण्यासाठी दर २ महिन्यांनी नेहमी पासवर्ड बदलू शकता. अशा प्रकारे जर कोणी आपला वायफाय पासवर्ड क्रॅक जरी केला तरी दोन महिन्यांनंतर वाय- फाय वापरु शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT