Nothing Smartphone
विज्ञान-तंत्र

Nothing Smartphone: ३० हजारांचा Nothing चा स्मार्टफोन मोफत मिळतोय, फक्त करावे लागेल 'हे' काम

नथिंग फोन १ स्मार्टफोन मोफत जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला केवळ Carl Pei यांच्या ट्विटखाली कॉमेंट करावी लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Nothing Phone (1) Get Free: Nothing चा पहिला वहिला स्मार्टफोन Phone (1) लाँचपासूनच चर्चेत आहे. हटके डिझाइनमुळे चर्चेत आलेल्या या फोनला आता फ्री मध्ये जिंकू शकता. Nothing ने संस्थापक Carl Pei याबाबतची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत यूजर्सला एका सोप्या कॉम्पिटेशनमध्ये भाग घेण्यास सांगितले आहे. यूजरला फोन जिंकण्यासाठी केवळ कॉमेंट करायची आहे. परंतु, यासाठी एक अट आहे.

ट्विटर यूजरला Carl Pei च्या पोस्ट खाली कॉमेंट करायची आहे. तुम्ही केलेल्या कॉमेंटला एकही लाईक मिळू नये, अशी ही अट आहे. म्हणजेच, ज्या व्यक्तीच्या ट्विटला एकही लाईक येणार नाही, त्या व्यक्तीला Nothing Phone (1) मोफत मिळेल.

जास्त लाईक्स असणाऱ्या ट्विटर यूजरला देखील मिळेल फोन.

केवळ एकही लाईक नसणाऱ्या यूजरलाच नाही, तर ज्या यूजरच्या ट्विटला सर्वाधिक लाईक्स मिळतील; ती व्यक्ती देखील नथिंगच्या फोनला मोफत जिंकण्याची संधी आहे. Carl Pei च्या या ट्विटला आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ४१ हजारांपेक्षा जास्त कॉमेंट्स आल्या आहेत.

तुम्ही देखील कार्ल यांच्या ट्विटखाली कॉमेंट करू शकता. २४ तासांच्या आत या पोस्टवर कॉमेंट्स करणाऱ्या यूजर्सला फोन जिंकण्याची संधी आहे. कंपनी २४ तासांच्या आत विजेत्यांची घोषणा करेल. कंपनी दोन विजेत्यांना स्मार्टफोन मोफत देणार आहे.लक्षात घ्या की कंपनीने आपल्या डिव्हाइसला प्रमोट करण्यासाठी गिववेचे आयोजन केले आहे.

हेही वाचा: Vasant More News : राज ठाकरेंच्या बेशिस्त नेत्यांना इशाऱ्यांनंतर वसंत मोरे बोलले; म्हणाले…

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी लाँच झालले्या नथिंगच्या या फोनची मूळ किंमत २७,४९९ रुपये आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर इन-बिल्ट LED लाइट्स देण्यात आली आहे. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT