After Apple company this company is going to remove charger from set esakal
विज्ञान-तंत्र

Apple नंतर आता मोबाईलसोबत 'ही' कंपनी देणार नाही चार्जर

उद्या या कंपनीचा नवीन हँडसेट लाँच होणार असून मोबाईलसह चार्जर मिळणार नाही म्हटल्यावर ग्राहकांची निराशा झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेकांचा ड्रीम मोबाईल म्हटल्या जाणाऱ्या Apple फोनसह कंपनी चार्जर देत नाही. आता Apple कंपनीच्या पाठोपाठ शाओमी कंपनीनेही असंच करण्याचं ठरवलंय. कंपनी उद्या नव्या बजेटचा 'Redmi Note 11SE' हा नवा हँडसेट लाँच करणार आहे. मात्र या फोनसह आता तुम्हाला चार्जर मिळणार नाही. शाओमी आधी Realme कंपनीने असंच केलेलं. (After Apple company this company is going to remove charger from set)

स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये कुठलं डिवाइस असो किंवा डिझाइन, किंवा कंपनीच्या पॉलिसीजसारख्या अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. उदा. आधी फोन विकत घेताना सोबत इयर फोनही मिळायचे. मात्र आता ते मिळत नाहीत. Appleने ही आधी 3.5mm ऑडियो रिमूव केला नंतर हळू हळू चार्जर रिमूव्ह केलेलं. आता ही स्ट्रॅटेजी जवळपास सगळ्याच कंपन्या करताना दिसतात.

सॅमसंगच्या अनेक फोन्ससह चार्जर मिळत नाही. अलीकडेच Realmeने देखील त्यांच्या एका स्वस्त्या Narzo 50A Prime फोनसह चार्जर दिलं नव्हतं. आणि आता शाओमी कंपनीचाही तसाच विचार दिसतेय. Redmi च्या अपकमिंग फोन Redmi Note 11SE मध्ये आता चार्जर मिळणार नाहीये. कंपनीने वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. उद्या लाँच होणारा नवा फोन Note 11 सीरीजचा नवा मेंबर असणार आहे.

मोबाईलच्या बॉक्समध्ये मिळतील या गोष्टी

फोन, चार्जिंग केबल, केस, सिम इजेक्टर टूल, क्विक गाइड आणि वॉरंटी कार्ड

Redmi Note 11SEचे स्पेसिफिकेशन्स

रेडमीच्या या हँडसेटमध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्पे असणार, जो 60Hzच्या रिफ्रेश रेटसह मिळू शकेल. हँडसेटमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर मिळेल. फोन मेध्ये 6GB RAM आणि 8GB RAMचं ऑप्शन मिळेल.

स्टोरेज - 64GB आणि 128GB

तसेच 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP मायक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर मिळेल. फ्रंटमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा मिळेल. डिवाइसमध्ये 5000mAhची बॅटरी आणि 33Wची फास्ट चार्जिंग मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT