Upcoming Smartphone Launch in India 
विज्ञान-तंत्र

पुढच्या आठवड्यात भारतात लॉंच होणार ३ दमदार स्मार्टफोन; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Smartphone Launch in India : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहा, कारण येत्या आठवड्यात भारतात काही दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. या लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्समध्ये Xiaomi, Realme आणि Tecno ब्रँडचे स्मार्टफोन आहेत. हे सर्व स्मार्टफोन मिड-बजेट सेगमेंटचे स्मार्टफोन (Smartphone Launch) असून लॉन्च होण्यापूर्वी या स्मार्टफोन्सच्या संभाव्य किंमती आणि फीचर्सबद्दल काही डिटेल्स जाणून घेऊया..

Xiaomi 11T Pro

Xiaomi 11T Pro स्मार्टफोन 6.67 AMOLED डिस्प्ले सह लॉंच केला जाऊ शकतो. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तर फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC चिपसेट वापरण्यात आला आहे. Xiaomi 11T Pro 5G च्या मागील पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच त्याचा मुख्य कॅमेरा 108-मेगापिक्सलचा असेल.

याशिवाय 8-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिली जाऊ शकते. यासोबत दुसरी टेलीफोटो लेन्स दिली जाण्याची शक्यता आहे , सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi 11T 5G स्मार्टफोन 5,000mAh बॅटरी सपोर्टसह येईल. तसेच फोनमध्ये 120W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल.

लॉन्च तारीख - 19 जानेवारी 2022

अपेक्षित किंमत - 40,000 रुपये

realme 9i

Realme 9i मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. त्याचे रिझोल्यूशन 2,400x1,080 पिक्सेल असेल आणि यामध्ये यूजर्सना Snapdragon 680 प्रोसेसर सपोर्ट मिळेल. Realme 9i स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यात 50-मेगापिक्सलची मुख्य लेन्स आणि दोन 2-मेगापिक्सेल सेन्सर असू शकतात.

याशिवाय फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोन 5000mAh बॅटरी सपोर्टसह येईल. ज्यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. Realme 9i स्मार्टफोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करेल. हा फोन 4 GB 64 GB आणि 6 GB आणि 128 GB अशा दोन रॅम व्हेरिएंटमध्ये येईल.

लाँच तारीख - 18 जानेवारी 2022

अपेक्षित किंमत - 15,000 रुपये

टेक्नो पोवा निओ (Tecno Pova Neo)

टेन्को पोवा निओ स्मार्टफोनमध्ये मोठा 6.82-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळेल. हा फोन एकाच व्हेरिएंट मध्ये लॉंच करण्यात येईल. ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असेल . Tecno Pova Neo स्मार्टफोनला Android 11 आधारित 7.6 HiOS सपोर्ट मिळेल. फोनमध्ये प्रोसेसर सपोर्ट म्हणून MediaTek Helio P22 चिपसेट सपोर्ट दिला जाईल. फोनला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

फोनच्या मागील पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट असेल आणि फोनमध्ये 13-मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलची लेन्स मिळेल फोनला 6 GB LPDDR4x चा मोठा रॅम सपोर्ट, तसेच 128 GB स्टोरेज दिले जाईल.

लॉन्च तारीख - 20 जानेवारी 2022

अपेक्षित किंमत - 15,000 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT