YouTube News In Marathi 
विज्ञान-तंत्र

YouTube चा मोठा निर्णय, आता दिसणार नाही डिसलाईक्सची संख्या

सकाळ डिजिटल टीम

व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube वरील व्हिडिओला अनेकदा मिळालेल्या डिसलाईक्सच्या संख्येमुळे व्हिडिओ निर्मात्याला (Content Creators) ट्रोल करण्यात येते, पण आता मात्र यापासून युट्यूबवरील कंटेट क्रियटर्सची सुटका होणार आहे. कारण आता YouTube ने प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओखाली दिसणारी डिसलाईक संख्या (Dislike Count) प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता सर्व वापरकर्त्यांना व्हिडिओला मिळालेल्या डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल व्हिडिओ बनवणाऱ्या क्रियटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना ट्रोलर्सच्या छळापासून वाचवण्यासाठी उचलण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की, यूट्यूबवरील व्हिडिओ किती लोकांनी डिसलाईक केला आहे, ते आता इतर लोकांना दिसणार नाही. काही देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामने वापरकर्त्यांना हे फीचर बंद करण्याचा पर्यायही दिला आहे.

भारतासह जगभरातील YouTube वर व्हायरल व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी मिळालेल्या लाइक्स आणि डिसलाईक्सच्या आधारावर बऱ्याच जणांना ट्रोल केले जाते. हे हल्ले कधीकधी Content Creators वैयक्तिकरित्या देखील केले जातात. यामुळे कंपनीने याआधी व्हिडिओमधील डिसलाइक बटण डिसेबल करण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता निर्मात्यांची जुनी मागणी पूर्ण करत यूट्यूबने डिसलाईक्सची संख्या लपवण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा परिणाम काय होईल?

वापरकर्ते अजूनही Google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube वर व्हिडिओ डिसलाईक करु शकतील, परंतु इतर किती जणांनी तो डिसलाईक केला आहे हे ते ते त्यांना दिसणार नाही. जगभरात ऑनलाइन छळ (Online harassment) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया साईट्स चालवणाऱ्या कंपन्या याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याच्या तक्रारी राजकारणी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत असतात. या वादांमुळे फेसबुकला अलीकडे अनेक मोठ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. आता यामध्ये काय फरक पडतो ते पाहण्यासारखे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP: युट्युबर सलीम वास्तिक यांच्यावर भरदिवसा हल्ला! CM योगी अ‍ॅक्शन मोडवर; AIMIM नेत्यासह ५ जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण तणावातही सोमवारी सोने, चांदी चढउतार सुरू

Budget 2026: कोस्टलचे पुढचे टप्पेही मार्गी! महापालिकेच्या अर्थसंकल्पात १,९५० कोटींची तरतूद

Agricultural Crisis : इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारताला; 'केप ऑफ गुड होप'च्या फेऱ्याने निर्यात महागणार!

T20 WC, IND vs WI: 'चांगल्या लोकांसोबत नेहमीच...', संजू सॅमसनच्या मॅच विनिंग कामगिरीनंतर सूर्यकुमार भावूक; Video

SCROLL FOR NEXT