Adventures Tourism esakal
टूरिझम

Adventures Tourism : कुछ तुफानी करते है! असं नुसतं म्हणून काय होतंय,आयुष्यात एकदा हा ट्रेक कराच

फक्त ८०० रूपयात जगातल्या सगळ्यात धोकादायक किल्ल्यावर ट्रेक

Pooja Karande-Kadam

Adventures Tourism : म्हातारपणीही एका उंच हरीहर गडावर चढणाऱ्या एका आजीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तो व्हिडिओ पाहून अनेकांना आपनही तसेच काहीसे करावे असे वाटले असेल. तर, तुम्हीही एखाद्या विकेंडला ऐतिहासिक आणि सर्वात धोकादायक असलेला ट्रेक करू शकता. त्यासाठी दूर कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणीही हा ट्रेक करू शकता.

तुम्ही मुंबईजवळ असलेल्या कलावंतीण किल्ल्याबद्दल ऐकले असेल. जगातील सर्वात धोकादायक आहे हा किल्ला आहे. हा किल्ला मुंबईजवळ सह्याद्री पर्वतात प्रबळ पठाराच्या उत्तरेला वसलेला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण समुद्रसपाटीपासून त्याची उंची 2,300 फूट आहे. एकेकाळी हा किल्ला शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी वापरला जायचा.मार्ग धोकादायक आहे.

समुद्रसपाटीपासून त्याची उंची 2,300 फूट आहे

या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला संपूर्ण एक दिवस चढून जावे लागेल. इथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही खूप अवघड आहे. उभ्या खडकात कोरलेल्या पायऱ्यांवर चालण्यासाठी आधाराची गरज भासते.इतकी कठीण चढाई करून तुम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलात. तर निसर्गाने रेखाटलेलं चित्र पाहून सगळा थकवा विसरायला होतो.

किल्ल्यावर कसे जायचे?

मुंबईपासून अवघ्या 47 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. कलावंतीण किल्ल्याचा ट्रेक ठाकूरवाडी गावातून सुरू होतो. येथे जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने पनवेलला जावे लागते.

स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुम्हाला बस पकडावी लागेल. ठाकूरवाडीला पोहोचायला एक तास लागेल. रिक्षाने तुम्ही ठाकूरवाडीला पोहोचाल.

दुर्गाची संरचना कशी आहे?

कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे. गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हटले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे.

कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.

कलावंतीण किल्ल्याचा ट्रेक ठाकूरवाडी गावातून सुरू होतो

पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 20-25 फुटांचा "रॉकपॅच" अथवा "पिनॅकल"चा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.

येथे जाण्याचा योग्य सिझन कोणता

पावसाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नका. जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. जर तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर स्थानिक लोकांसाठी तुम्हाला 150 रुपयांपर्यंत खर्च येईल, तर प्रवासी गट तुमच्याकडून 800 ते 1000 रुपये आकारू शकतात. काही कंपन्या गडावरच रात्रीच्या मुक्कामाची आणि कॅम्पिंगची सुविधा देखील देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT