Amarnath Cave Esakal
टूरिझम

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करताय? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे (Cororna) गेली दोन वर्ष यात्रा, प्रवास बंद होत. सरकारने कोरोना निर्बंध हटवल्यानंतर आता यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यातच अमरनाथ (Amarnath Cave)यात्रेची नोंदणी आजपासून (ता.११) सुरू होत आहे. यंदा ही यात्रा ३० जूनपासून सुरू होत आहे. तुम्हालाही या प्रवासाला जायचे असेल तर यासाठी नेमकी तयारी कशी करावी, नोंदणी कशी करावी, किती पैसे लागतील? नोंदणी करत असताना आॅनलाईन कि आॅफलाईन करावी याची सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमची अमरनाथ यात्रा सुखकर होईल आणि त्रासही होणार नाही.

नोंदणी करण्यासाठी काय करावे

अमरनाथ यात्रेसाठी ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी जवळच्या म्हणजे पंजाब नॅशनल बँक, जम्मू आणि काश्मीर बँक किंवा येस बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन नोंदणी करू शकता. जे नोंदणी करणार आहेत त्यांचे आधार कार्ड, ४ पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सरकारी रुग्णालयाचे आरोग्य प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावे लागेल. यानंतर तुमची नोंदणी केली जाते. आणि उपलब्ध स्लॉटनुसार प्रवासाची तारीख दिली जाते. त्याचा तपशील बँकेकडून मिळालेल्या पावतीवर मिळतो.

नोंदणी करतानाचे निकष

अमरनाथ यात्रेसाठी काही निकष निश्चित केले आहेत. नोंदणी करत असताना ६ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती महिला,१३ वर्षाखालील मुले आणि ७५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध यांना नोंदणी करता येत नाही.

राहण्याची सुविधा

अमरनाथ जी श्राइन बोर्ड अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सोयीसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था करते. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संस्थाही व्यवस्था करतात. यावर्षी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी श्राइन बोर्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) चा वापर करून वाहने आणि प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व यात्रेकरूंना RFID टॅग कार्डही दिले जाणार आहे.

अमरनाथ यात्रेचा एकूण खर्च किती?

अमरनाथमध्ये राहण्यासाठी अतिशय स्वस्त धर्मशाळा आणि मोफत जेवणाची व्यवस्था आहे. जर तुम्ही स्लीपर ट्रेनने जाऊन अमरनाथला कोणत्याही लक्झरी सुविधांशिवाय प्रवास केला तर तुम्हाला परव्यक्ती सुमारे ५००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी अशी करा तयारी

प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्या. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान ४-५ किमी चालण्यास सुरुवात करा. योग, प्राणायाम आणि दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव करा. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. तुमच्या सभोवतालच्या गिर्यारोहण क्षेत्रात चढण्याचा आणि उतरण्याचा सराव करा. यात्रेमध्ये एका दिवसात फक्त १० हजार यात्रेकरूंना जाण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला जर काही अडचण आलीच तर टेकडी बचाव,जम्मू आणि काश्मीर पोलीस,लष्कराच्या छावण्यांची मदत घेऊ शकता.

देशातील काही मोठ्या शहरांपासून अमरनाथचे अंतर

दिल्लीपासून ६३१ किमी

भोपाळपासून १२३४ किमी

रायपूरपासून १५६१ किमी

जयपूरपासून ८१२ किमी

बंगलोर पासून २३७० किमी

मुंबईपासून १७०२ किमी

लखनऊपासून ९७० किमी

पाटण्यापासून १३३२ किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT