Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023  esakal
टूरिझम

Ashadhi Ekadashi 2023: महाराष्ट्रच नाही तर देशभरात आहेत विठ्ठलभक्त, पहा विठोबाची खास मंदिरे!

Pooja Karande-Kadam

Ashadhi Ekadashi 2023 :  आषाढी एकादशी आज पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. केवळ पंढरपूर नाही तर देशभरात विठ्ठल भक्त आहेत. विठ्ठलाचे भक्त जिथे तिथे त्याचे मंदिर निर्माण झाले आहे. पंढरीत जसे पांडुरंगाचे मंदिर आहे तसे देशभरातही विठ्ठलाची मंदिरे आहेत.  

देशात गोवा, आंध्र प्रदेश, तिरूपती या ठिकाणी पांडुरंगाची मोठी मंदिरे आहेत.आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण विठ्ठलाच्या काही खास मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील विठ्ठलाची मंदिरे

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील टाकळीमान येथे श्रीविठ्ठल- रुक्मिणीचे मंदिर आहे. येथील श्रीविठ्ठलाचे वैशिष्ट्य असे की, ते चतुर्भुज स्वरूपात आहेत. त्याचे दोन हात कमरेवर आहेत आणि दोन हातांत त्यांनी क्रमशः शंख आणि गदा धारण केलेली आहे. त्याच्या डाव्या बाजूस श्रीरुक्मिणी मातेचा श्रीविग्रह शोभत आहे.

गोवा

गोवा येथे बलवन्ता नदीच्या काठी फार प्राचीन आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सन १९४२ मध्ये झाला. मंदिराचे निर्माण आणि शिल्प उत्तर भारतीय पद्धतीचे आहे. चैत्र पौर्णिमेच्या आधी ९ दिवस मंदिरात खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव येथील मुख्य उत्सव आहे.

गोवा येथे बलवन्ता नदीच्या काठी फार प्राचीन आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे

आंध्र प्रदेशातील विठ्ठल मंदिरे

अहोबलम्

आंध्र प्रदेशातील कुर्नुल अहोबलम् येथे श्रीविठ्ठलांचे फार प्राचीन विग्रह आहेत. हे दर्शनी भागावर कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभे असून, हातात शंख आणि कमळनाळ आहे. अंगावर विविध अलंकार असून माथ्यावर उंच नक्षीदार मुकुट आहे.

तिरुपती

श्रीक्षेत्र तिरुपती येथील प्रमुख श्री बालाजी मंदिरापासून पश्चिम दिशेस २२ कि.मी. अंतरावर छोटेसे पांडुरंगाचे विठ्ठल मंदिर आहे. येथे सिंहासनावर ठेवलेल्या कमळामध्ये श्रीविठ्ठल उभे असून त्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत.

उजव्या हाताचा तळवा दिसत असून हातात कमळ आहे. डाव्या हातात शंख आहे. कमरेला मेखला असून माथ्यावर मुकुट शोभत आहे. गळ्यात हार, जानवे, कानांत मकरकुंडले, अंगावर दागिने असा त्याचा शृंगार आहे.

मच्छलीपट्टणम्

पांडुरंग स्वामी मंदिर, चिलकलपुडी, मच्छलीपट्टणम् हे मंदिर पंढरपुराच्या पांडुरंग मंदिराची प्रतिकृती समजण्यात येते. येथे मुख्य मंदिराच्या आजूबाजूस १०८ मंदिरे आहेत. येथे नोव्हेंबर महिन्यात मध्यम तेलुगु महिन्यानुसार माघ महिन्यात उत्सव होतो.

पांडुरंग स्वामींच्या क्षेत्राला 'कीर पंडरीक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. सामान्यतः दक्षिणेकडील मंदिरात विग्रहाचे किंवा मूळ मूर्तीचे दर्शन खूप दुरूनच घ्यावे लागते.

आंध्रातील भाविकांच्या हृदयात चिलकलपुडीच्या विठ्ठलास जे स्थान मिळाले आहे, त्याचे एक महत्त्वाचे हेही कारण आहे. यास 'प्रति पंढरपूर' असेही म्हटले जाते.

श्रीक्षेत्र तिरुपती येथील प्रमुख श्री बालाजी मंदिरापासून पश्चिम दिशेस २२ कि.मी. अंतरावर छोटेसे पांडुरंगाचे विठ्ठल मंदिर आहे

तामिळनाडूतील विठ्ठल मंदिरे

तंजाऊर तामिळनाडू प्रांतात जाऊर जिल्ह्यातील श्रीविष्णू मंदिरातून श्रीविठ्ठलाचे अतिशय प्राचीन विग्रह आहेत. वेदीच्या मध्यावर श्रीविठ्ठल कटेवर हात ठेवून उभे असून त्याच्या दोन्ही बाजूस श्रीदेवी आणि भूदेवी मातेचेही श्रीविग्रह आहेत.

श्रीरंगम्

तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगम् येथेही श्रीविठ्ठलाचा विग्रह असून, कमरेवर असलेल्या त्याच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. हे श्रीरंगम् येथील एक प्राचीन मंदिर आहे.

केरळमधील विठ्ठल मंदिरे

श्रीपांडुरंग मंदिर, केरळ

सन १९६९ साली बांधले गेलेले हे मंदिर श्रीशुक्रन्द्र कला मंदिराजवळ आहे. श्रीवीर विठ्ठल मंदिर, केरळ श्रीवीर विठ्ठल मंदिर' हे अतिशय प्राचीन मंदिर - असून त्याचे निर्माण केव्हा झाले या बाबतीत अजून माहिती नाही.  

श्रीराम आणि श्रीवीर विठ्ठलाच्या मुख्य मूर्ती या मंदिरात आहेत. माघ शुद्ध पीची प्रतिष्ठा वादान्ती आणि कार्तिक पौर्णिमा हे येथील मुख्य उत्सव आहेत.

सन १९६९ साली बांधले गेलेले हे मंदिर श्रीशुक्रन्द्र कला मंदिराजवळ आहे

कर्नाटकातील विठ्ठल मंदिरे

श्रीविठ्ठल मंदिर, गोविंदहळ्ळी, कृष्णराजपेट कर्नाटक जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी येथे श्रीविठ्ठलाचे अतिशय सुंदर मंदिर असून, येथील श्रीविठ्ठलाची श्रीमूर्ती म्हणजे हस्तकलाशिल्पाचे अत्यंत सुंदर उदाहरण आहे.

बसरूल - कर्नाटक येथील बसरूल येथे मल्लिकार्जुन मंदिरात श्रीविठ्ठलमूर्ती असून

हस्तकलेचे ते एक सुंदर उदाहरण आहे. हा विग्रह अतिशय प्राचीन आहे.

नागळापूर – कर्नाटक प्रांतात तिरुबेकेर येथे श्री चेन्नकेशव मंदिरात श्रीविठ्ठलमूर्ती आहे.

हरळाहळ्ळी - कर्नाटकात हसत जिल्ह्यात चेन्नकेशव मंदिरात प्राचीन श्रीविठ्ठलमूर्ती असून हा विग्रह फार उंच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT