Tourist Places in Gaganbawda esakal
टूरिझम

Traveling Tips : फिरायला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'या' पर्यटनस्थळांवर पाऊस कमी होईपर्यंत असणार आहे बंदी!

मुसळधार पर्जन्यवृष्टी, पूरपरिस्थिती याचा विचार करुन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठ- दहा दिवसांपासून तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गगनबावडा तालुक्यात येत आहेत.

Gaganbawda News : गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तालुक्यातील सहा पर्यटनस्थळांवर (Tourist Spot) आजपासून पर्यटक व नागरिकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मुसळधार पर्जन्यवृष्टी, पूरपरिस्थिती याचा विचार करुन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील पर्जन्यमान कमी होईपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी दिली.

गेल्या आठ- दहा दिवसांपासून तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गगनबावडा तालुक्यात येत आहेत. मात्र, सोमवारपासून तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हौशी पर्यटक धरणामध्ये पोहण्यासाठी जाण्याची शक्यता असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परिणामी, हवामान खात्याने वेळोवेळी दर्शविलेल्या जास्त पावसाच्या दिवशी व पूरजन्य परिस्थितीमध्ये नागरिक व पर्यटक यांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पुराचे पाणी येऊन पर्यटक अडकून पडण्याच्या घटना, हौशी पर्यटक घसरुन पडून गंभीर होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे मुसळधार पर्जन्यवृष्टीमध्ये कोणताही अनर्थ घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे.

हुल्लडबाज आणि मद्यपी पर्यटकांमुळे काहीही घडू शकते. परिणामी आजपासून गगनबावडा तालुक्यातील गगनगिरी गड, पळसंबे रामलिंग लेणी तसेच लखमापूर, कोदे, अणदूर व वेसरफ या तलावांच्या सांडव्याचा परिसर आदी पर्यटनस्थळे पर्यटक व नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ.पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Gift: टीव्ही 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार; एसी आणि गाड्यांच्या किमतीही कमी होणार, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प, ठाण्यात प्रवासी रुळावर उतरले

Kolhapur Highway Flood : कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर पाणी, कोकणात जाणारे दोन घाट बंद; अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

वोटिंग मशिन चुकीचे, महाग अन् वादग्रस्त; वॉटरमार्क पेपरवर मतदान घेणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

'माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना जिवे मारण्याची धमकी', कीर्तनकार भंडारेंच्या व्हिडिओने राज्यभर खळबळ..

SCROLL FOR NEXT