टूरिझम

Travel : बाईक ट्रिपला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

ट्रेकिंग आणि बाईकने प्रवास करणे हा कित्येकांचा छंद असतो.

सकाळ डिजिटल टीम

अनेकांना प्रवासाची आवड असते. डोंगरमाथ्यावर बेधुंद होऊन फिरण्यासाठी अनेकजण आतुर असतात. ट्रेकिंग आणि बाईकने प्रवास करणे हा कित्येकांचा छंद असतो. साहसाने भरलेली सहल करण्यात त्यांना एक वेगळं समाधान भेटतं. अशावेळी अनेकजण लांबचा प्रवास करतात.

असा प्रवास करणारे बस, रेल्वे किंवा कारचा वापर न करता बाईकचा वापर करतात. बाईकने प्रवास करण्यात एक किक आहे असे त्यांच म्हणण असतं. मात्र असा प्लॅन करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. अशावेळी तुम्ही पहिल्यांदा असा प्रवास करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेण्यासाठी ही बातमी वाचा.

आज तुम्हा अशाच काही बाईक ट्रॅव्हल ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा हा प्रवास सुखकर आणि अविस्मरणीय होईल. चला तर मग पाहुया बाईक ट्रिपसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते ते..

आरामदायक बाईकची निवड करा

अनेकांना दूरवरच्या एखाद्या शांत गावाला बाईक ट्रिप करायची असते. मात्र यासाठी तुम्ही आरामदायी बाईकचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा प्रवास न थकता होईल. तसेच लांबच्या प्रवासासाठी बाईक कंडिशनमध्ये असणेही गरजेचे असते. त्यामुळे ती विशेष काळजी घ्यावी लागते.

बाईकची सर्व्हिसिंग करा

बाईक ट्रिपला जात असताना बाईकची सर्व्हिसिंग करणे हे महत्वाचे काम आहे. ट्रिपला जात असताना सोबत बाईकचे टायर आणि ब्रेक नीट तपासणे आवश्यक आहे. बाईकची सर्व्हिसिंग नेसल तर प्रवासात बाईक बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाईकची काही कामे असतील तर ती करुन घ्या.

बाईक ड्रेस

बाईक ट्रिपदरम्यान कोणताही ड्रेस घालू नका, चांगल्या दर्जाचे बाईक रायडिंगचे जॅकेट, घोट्याचे बूट, रायडिंग पॅंट किंवा कॅनव्हास परिधान करा. यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या प्रवास करु शकता. याशिवाय तुम्ही या ड्रेसकोडमुळे एक खराखुरा बाईक रायडर दिसू शकाल आणि त्या प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

सोबत कोणत्या वस्तू घ्याल?

बाईक ट्रिपला जात असताना आवश्यकतेनुसार सामान पॅक करा. तुम्हाला लागणारे कपडे, खाण्याचे साहित्य, औषधे आणि काही आवश्यक असणारे साहित्य तुम्ही घेऊ शकता. या वस्तु सोबत असल्यास तुम्हाला गरज भासली तरच एखाद्या ठिकाणी काही खरेदी करावी लागेल आणि तुमचा प्रवास विनाअडथळा होईल.

अचून मार्गांची माहिती

कोणत्याही बाईक सहलीला निघण्यापूर्वी मार्गाबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. या मार्गांच्या अचूक माहितीसाठी आधी तुम्ही एखादा नकाशा सोबत ठेवू शकता. जो तुम्हाला प्रवासादरम्यान मदत करु शकेल. याशिवाय या मार्गांतील माहितीची काही पुस्तकही तुम्ही सोबत ठेवू शकता. जी तुम्हाला प्रवासात मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT