ST Bus Corporation esakal
टूरिझम

Shravani Tourism : एसटी महामंडळाकडून महिलांसाठी खास ऑफर; आता सहलीसाठी सवलतीच्या दरात मिळणार 'लालपरी'

श्रावण महिन्यात महिला व नागरिक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी जातात.

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच तालुक्यातील घारेवाडीच्या महिलांनी शासनाच्या सवलतीच्या दरात श्रावणी सहलीचा आनंद लुटला.

कऱ्हाड : श्रावण महिन्यात महिला व नागरिक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाच्या वतीने खास श्रावणी सहलीसाठी (Shravani Sahal) बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्याअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातील महिलांसाठी या श्रावण सहलीसाठी एसटीने सवलतीच्या दरात महिलांसाठी बस उपलब्ध केल्या आहेत. त्याचा महिलांना लाभ घ्यावा, असे आवाहन येथील एसटी आगार प्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी केले आहे.

भाविक विशेषतः महिला या श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जातात. त्याचा विचार करून एसटी महामंडळाने महिलांच्या श्रावण सहलीसाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शनिवार व रविवार शालेय वाहतूक कमी असल्याने या दिवशी श्रावणी सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

नुकतेच तालुक्यातील घारेवाडीच्या महिलांनी शासनाच्या सवलतीच्या दरात श्रावणी सहलीचा आनंद लुटला. गावातील ४६ महिला या सहलीत सहभागी झाल्या होत्या. घारेवाडीतील उमेद अभियानांतर्गत धुळेश्वर महिला ग्रामसंघ स्त्री सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संघाच्या माध्यमातून महिलांची श्रावणी सहल काढण्यात आली.

त्याचबरोबर मसूर, चचेगाव, कऱ्हाड, बनवडी अन्य दहा गावांतील महिलांनी अष्टविनायक, प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगणी, पंढरपूर व अन्य धार्मिक ठिकाणच्या श्रावणी सहलीचा आनंद लुटला आहे. कऱ्हाड तालुक्यातील महिलांनीही एसटीच्या सवलतीच्या दरातील बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख श्रीमती पोळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात; पुणे पोलिसांनी काढली धिंड

...आणि नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी बाबांनी वाचली; मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेदार किस्सा

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT