Krishna River Mahaganpati Temple esakal
टूरिझम

Ganeshotsav 2025 : कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदिर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

Krishna River Mahaganpati Temple : सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं कृष्णा नदीच्या काठी हे पुरातन मंदीर आहे. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये हे मंदीर उभारलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Discover the Krishna River Mahaganpati Temple in Wai during Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाच्या उत्साहाने सध्या वातावरण भारून गेलं आहे. या काळामध्ये भाविक विविध ठिकाणच्या गणपती मंडळांना, प्रसिद्ध गणपती मंदिरांना भेटी देतात. असंच एक प्रसिद्ध मंदीर कृष्णा नदीच्या काठी आहे. या मंदिरासोबतच इथला परिसरही प्रसन्न करणारा आहे. याच मंदिराबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं कृष्णा नदीच्या काठी हे पुरातन मंदीर आहे. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये हे मंदीर उभारलं आहे. या मंदिरामध्ये एका सलग दगडातून घडवलेली गणपतीची भव्य मूर्ती आहे. या गणपतीच्या भव्य आणि विशाल आकारामुळे त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असं म्हणतात. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की नदीच्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी या मंदिराच्या गर्भगृहाच्या मागच्या भिंतीची रचना नावेच्या टोकासारखी, मत्स्याकार बांधलेली आहे.

गर्भगृहामध्ये छोट्या चौथऱ्यावर गणपतीची भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. ही मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली आहे. हा दगड कर्नाटकातून आणला असल्याची माहिती या मंदीर प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या या मूर्तीला भगवा रंग दिलेला आहे, त्यामुळे मूर्तीचा मूळ रंग दिसत नाही. हा गणपती दोन्ही मांड्या रोवून बसलेला आहे. या मूर्तीवर सुबक दागिने, यज्ञोपवित कोरलेलं आहे.

हे मंदीर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी वाई इथल्या कृष्णा नदीपात्रामध्ये बांधलं. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे, मत्स्याकार आकारामुळे नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर पाणी दुभंगलं जातं, त्यामुळे पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदीर सुरक्षित राहतं. या गर्भगृहाचं छत हा स्थापत्यशैलीचा अनोखा नमुना आहे. चुना आणि फरशीचा वापर करून छताच्या दगडाला खाचा पाडून दगडांच्या मदतीनेच तिथे सजावट करण्यात आली आहे. महागणपती मंदिराचं शिखर हे वाईतल्या सर्व मंदिरांमध्ये सर्वात उंच आहे.

वाई हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं क्षेत्र आहे. वाईला दक्षिण काशी असंही म्हणतात. वाई हे शहर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी आणि घाटांसाठी प्रसिद्ध आहे. वाई परिसरामध्ये श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, रोकडोबा हनुमान मंदीर अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?

भारतातल्या नियमांचा फटका, सेबीची समजून घेण्यात चूक; ५४६ कोटी जप्त करण्याच्या आदेशावर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : शरद पवार लवकरच बाबा आढाव यांची भेट घेणार!

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Thane Traffic: ठाणे घोडबंदर मार्ग २४ तास बंद, कधी अन् का? जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT