Garhkundar Fort Secret esakal
टूरिझम

Garhkundar Fort Secret : या रहस्यमयी किल्ल्याने गिळंकृत केली लग्नाची वरात; गुप्त खजिन्याचा आहे रखवालदार!

किल्ल्याचे तीन मजले जमिनीवर दिसतात. तर दोन मजले जमिनीखाली

सकाळ डिजिटल टीम

भारत हा देवतांचा, मंदिरांचा देश आहे. इथल्या देवतांची मंदिरेही भव्य आहेत. त्या भव्यतेसारखे भव्य किल्लेही भारतात प्रसिद्ध आहेत. तुम्ही इथली अनेक किल्ले पाहिले असतील. भारतात असे काही किल्ले आहेत जे कोणी आणि का बांधले हे कोणालाच माहीत नाही. असे प्राचीन किल्ले नेहमीच गूढ आणि कुतूहलाचे कारण राहिले आहेत. असाच एक किल्ला भारतात अस्तित्वात आहे.

आज आपण अशा किल्ल्यांबद्दल जाणून घेऊयात. ज्याचे रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे. मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यात गढकुंदर हा किल्ला आहे. 11व्या शतकात बांधलेला हा किल्ला पाच मजली आहे.

Garhkundar Fort

किल्ल्याचे तीन मजले जमिनीवर दिसतात. तर दोन मजले जमिनीखाली आहेत. हा किल्ला कोणी व केव्हा बांधला याची नेमकी माहिती नसली तरी हा किल्ला १५०० ते २००० वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. चंदेल, बुंदेल, खंगार अशा अनेक राज्यकर्त्यांनी येथे राज्य केले आहे.

Garhkundar Fort

या किल्ल्यावर चंदेल, बुंदेल, खंगार यांसारख्या शासकांनी राज्य केलं. हा ‘गढकुंडार’ किल्ला पूर्वी ‘जिनागढ महाल’ या नावाने ओळखला जायचा. पृथ्वीराज चौहान यांचे प्रमुख आणि जवळचे स्नेही असलेल्या गुजरातच्या खेत सिंह यांनी हा किल्ला जिंकून खंगार वंशाची इथे स्थापना केली. तोवर हा किल्ला ‘जिनागढ महाल’ या नावाने ओळखला जायचा.

गडकुंदरचा हा किल्ला भारतातील अनेक रहस्यमय किल्ल्यांमध्ये गणला जातो. किल्ल्याजवळ राहणारे लोक सांगतात की, काही वर्षापूर्वी जवळच्या गावात लग्नाची वरात होती. वरात या किल्ल्याजवळ येऊन थांबली. सुंदर किल्ला पाहण्यासाठी वरातीतील लोक फिरत होते. त्यानंतर काही लोक लोक तळघरात गेले. त्यानंतर ते लोक अचानक गायब झाले. त्या वरातीतील 50 ते 60 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. यानंतर अशा अनेक घटना पाहिल्या, त्यानंतर खालील सर्व दरवाजे बंद करण्यात आले.

Garhkundar Fort

हा किल्ला एखाद्या चक्रव्यूहापेक्षा कमी नाही. तुम्हाला किल्ल्याची माहिती नसेल तर तुमचा चक्रव्युहात अडकू शकता. किल्ल्यात सर्वत्र अंधार असतो त्यामूळे तूम्हाला दिवसाचीही भिती वाटू शकते. किल्ल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न करणाऱ्यांना किल्ल्यापर्यंत पोहोचताच येऊ नये आणि त्यांनी कुठेतरी भरकटून जावं अशा प्रकारची या किल्ल्याची रचना आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT