History Of Qutub Minar
History Of Qutub Minar  esakal
टूरिझम

History Of Qutub Minar :कुतुब मिनारच्या एका विटेवर "श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता" असं लिहीलेलं का आढळतं?

Pooja Karande-Kadam

History Of Qutub Minar : कुतुब मिनार ही देशातील प्रमुख ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. हे दक्षिण दिल्लीच्या मेहरौली भागात आहे. सुमारे 238 फूट उंचीचा कुतुब मिनार हा भारतातील सर्वात उंच दगडी स्तंभ आहे. कुतुब मिनार आजूबाजूला असलेल्या इतर अनेक स्मारकांनी वेढलेले आहे आणि या संपूर्ण संकुलाला कुतुब मिनार कॉम्प्लेक्स म्हणतात.

१३ व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरुवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडानी बांधलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले. पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पूर्ण करू शकला. त्याचा ऊत्तराधिकारी इल्तमश याने मिनारचे पुढील बांधकाम पूर्ण केले.

एकूण १०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची २३७.८ फूट इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत १४.३२ मीटर इतका आहे. सर्वात शेवटचा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्प कोरलेली आहेत.

१०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर

कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केले होते, तथापि, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी इल्तुतमिश याने या मनोऱ्याचे काम पूर्ण केले. मिनाराभोवती एक सुंदर बाग आहे. यासोबतच अलाउद्दीनचा मदरसा, इल्तुतमिशची कबरही येथे आहे. पूर्वी उघडलेल्या या मिनारावर जाण्यासाठी दरवाजा बनवण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर ते बंद करण्यात आले. त्याच्या बंद बद्दल अनेक कारण समोर आले.

कुतुब मिनारच्या नावामागील कथा काय आहे?

येथे कुठेही स्थापित नाही की, कुतुब मिनारचे नाव कुतुबुद्दीन ऐबकच्या नावावर आहे, ज्याने त्याचे बांधकाम सुरू केले की प्रसिद्ध मुस्लिम सूफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर कुतुब किंवा कुतुबमिनार हे नाव इंग्रजांच्या काळात खूप लोकप्रिय झाल्याचे इतिहासकार सांगतात.

कुतुब मिनारचे नाव कुतुबुद्दीन ऐबकच्या नावावर नाही..तर

कुतूबमिनारचा दरवाजा का बंद होता

1981 मध्ये येथे लोकांसोबत एक भीषण अपघात झाला होता. सन १९८१ मध्ये कुतुबमिनार, दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंडल्यामुळे अंधार झाला.त्यामुळे झालेल्या धावपळीत ४५ लोकांचा मृत्यू. त्यातच कोणीतरी कुतुबमिनार पडतो आहे अशी ठोकलेली अफवा. यात लहान मुलांची संख्या जास्त होती

हिंदू मंदीरांचे अवशेष

परिसरात लाल कोट ही दिल्लीचे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या परिसरात आधी २७ हिंदू आणि जैन मंदिरे होती. ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड - विटांपासुन कुतुब मिनारची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर एका ठिकाणी "श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता" असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT