cheap flight tickets tips  
टूरिझम

Travel : स्वस्तात फ्लाइट बुक करायची असेल, तर 'या' सिक्रेट ट्रिक्स नक्की फॉलो करा

आजकाल बहुतेक लोक ट्रेनऐवजी विमानाने प्रवास करणे पसंत करतात.

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यांनाच प्रवास करायला आवडतो. आपण ट्रिपचे अनेक प्लॅन करतो. परंतु प्रवासाचा वाढता खर्च कधीकधी तुमचा प्लॅन खराब करू शकतात. आजकाल बहुतेक लोक ट्रेनऐवजी विमानाने प्रवास करणे पसंत करतात. वेळेची बचत होईल हाही उद्देश त्यामागे असतो. पण, प्रत्येकालाच हे परवडेल असे नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात फ्लाइट तिकीट बुक करू शकता. (cheap flight tickets tips)

तिकीट बुकिंगसाठी योग्य वेळ निवडा

तुम्ही सण किंवा सरकारी सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दुप्पट किमतीत फ्लाइट तिकीट बुक करावे लागेल. सुट्ट्या येणार नाहीत अशी वेळ प्रवासासाठी निवडण्याचा प्रयत्न करा. विकेंड ऐवजी सोमवार ते गुरुवार या दरम्यान तिकीट बुक करा. दुपार आणि संध्याकाळच्या तुलनेत सकाळच्या वेळी तिकिटे अधिक स्वस्त असतात.

टेक्निकली हुशार व्हा

अनेकदा असे होते की, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विमानाच्या तिकिटाची किंमत ऑनलाईन चेक केल्यावर कमी असते. आणि थोड्यावेळाने पुन्हा किंमत पाहिल्यावर ती वाढलेली दिसते. कारण तुमच्या कॉम्प्युटर किंवा फोनच्या कुकीज आणि सर्व्हरचे डिटेल्स तिकीट बुकिंग वेबसाइटवर दिले जातात. तुम्ही सर्च केल्याने विमान कंपनीला कळते की, तुम्ही तिकीट बुक करण्याचा विचार करत आहात. यासाठी तुम्ही तिकीटाची किंमत पाहण्यासाठी इंकॉग्निटो विंडो (प्राइवेसी मोड, प्राइवेट सर्च) याद्वारे तिकीटाचे दर पाहू शकतात. ऑनलाईन रेट चेक केल्यावर हिस्ट्री हटवणे हा एक सोपा मार्ग आहे. तसेच, तुम्ही तिकीट बुक कराल तेव्हा दुसरा कॉम्पुटर किंवा फोन वापरू शकता.

सेंटर लाईन स्वस्त

एअरलाईन्स कंपन्या तिकिटे खपवण्यासाठी अनेक आयडिया शोधतोत. ग्राहकांना एकाच फ्लाइटमध्ये वेगवेगळ्या भाड्यांचा पर्याय देतात. इकॉनॉमी क्लासमध्ये मधल्या रांगेत चेक-इन बॅगेजला परवानगी नसून जेवणही नाही. पण या क्लासची तिकिटे स्वस्त आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्त तिकिटे बुक करायची असतील तर तुम्ही हा पर्याय देखील निवडू शकता.

ऑफर चेक करा

एअरलाइन्स कंपन्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांवर कॅशबॅक ऑफर देतात. या ऑफर्स वापरून तुम्ही तिकीट बुक करू शकता. कधीकधी तिकीटावर 50% च्या ऑफर सुद्धा देतात. म्हणूनच तिकिटांचे बुकिंग करताना या ऑफर्स काळजीपूर्वक पहा. तुम्ही Paytm, Mobikwik किंवा Freecharge द्वारे देखील पेमेंट करू शकता. यावर चांगला कॅशबॅक उपलब्ध आहे.

हँड-बॅगेज ऑप्शन

तुम्ही एकटेच प्रवास करणार असाल. तुमच्याकडे जास्त सामानही नसेल तर तुम्ही फ्लाइट बुक करताना हँड-बॅगेज (Hand Bags) ऑप्शन निवडा. सामान जास्त असेल तर खर्चही वाढतो, त्यामुळे कमी सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा चांगला ऑप्शन आहे.

इतर वेबसाईट तपासा

सर्व विमान कंपन्यांच्या तिकीटाचे दर एकच असतील असे नाही. म्हणूनच तिकिट बुक करण्यापूर्वी एकापेक्षा अधिक वेबसाइट चेक करा. तुम्ही Skyscanner, Momondo आणि Kayak सारख्या साइटवरील किंमत कम्पेअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT