neil island google
टूरिझम

नील बेटाबद्दल 'या' गोष्टी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सकाळ डिजिटल टीम

अंदमान आणि निकोबार बेट (andaman and nikobar island) हे भारतातील सर्वात सुंदर बेट आहे. येथील समुद्रकिनार्‍यावरील शांतता आणि समुद्रातील उंच लाटा सर्वांना भूरळ घालतात. असेच येथे नील बेट (neil island) आहे. हे बेट अतिशय लहान असून सुंदर आहे. कोरल रीफ आणि उत्कृष्ट जैवविविधतेमुळे हे बेट अंदमानप्रमाणे लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला सुंदर बेटाबद्दलच्या अधिक मनोरंजक गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत. (know all about neil island)

शहीद द्विप -

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानच्या तीन बेटांचे नाव बदलण्याची घोषणा केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहताना त्यांनी रॉस आयलँड, हेवलॉक आयलँड आणि नील आयलँड असे नामकरण केले. तेव्हापासून नील बेट आता शहीद द्विप म्हणून ओळखले जाते. त्याचवेळी रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट आणि हेवलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप असे नाव पडले.

वेजीटेबल बाऊल -

अन्नप्रेमी नील बेट किंवा शहीद द्विप यांना अंदमानची वेजीटेबल बाऊल म्हणतात. जसा हेवलॉक बेट सीफूडसाठी लोकप्रिय आहे, त्याप्रमाणे नील आयलँड ताजे, शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. सर्व ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी नील स्थानिक बाजारपेठ उत्तम पर्याय आहे. शाकाहारी आणि शाकाहारी व्यतिरिक्त आपल्याला चिनी, इस्त्रायली, कॉन्टिनेंटल, नेपाळी आणि इटालियन खाद्यपदार्थांचा पर्याय देखील मिळतो.

हावडा ब्रिज -

तुम्हाला वाटले असेल की कोलकाताच्या हावडा ब्रिजबद्दल येथे का चर्चा केली जात आहे. पण तसं नाही. नील बेटावर देखील एक हावडा ब्रिज आहे. दोन मोठ्या दगडांनी बनलेला हा नैसर्गिक पूल नील बेटावरील प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. नील बेटावर स्थायिक झालेल्या बंगाली लोकांनी प्रथम त्याचे नाव रवींद्रनाथ सेतू ठेवले आणि त्यानंतर हावडा ब्रिज असे नाव पडले.

सुभाष मेला -

नील द्विपच्या प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे सुभाष मेला असून हा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा उत्सव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आहे. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पारंपारिक वेष परिधान करून स्थानिक लोक पारंपारिक अन्न शिजवतात आणि पर्यटकांसोबत आनंद साजरा करतात. जर तुम्ही अंदमानला कधी भेट देत असाल तर सुभाष मेळ्याचा नक्की आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT