2023 long Weekend Trip esakal
टूरिझम

2023 long Weekend Trip: नव्या वर्षात धमाल करायला ही कमाल ठिकाणं जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

आज आपण संपूर्ण नव्या वर्षात तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी फिरायला जाता येईल ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

New Year Trip Planning: नवं वर्ष सुरू व्हायला अगदी काहीच दिवस उरलेत. नव्या वर्षाच्या सुरूवातीला आणि जुन्या वर्षाच्या शेवटाला जवळपास सगळेच कुठेतरी एन्जॉय करायला जायचा विचार करत असतात. मात्र काही कारणाने इयर एन्ड किंवा नव्या वर्षाला तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकले नाहीत तर निराश होऊ नका. आज आपण संपूर्ण नव्या वर्षात तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी फिरायला जाता येईल ते जाणून घेऊया.

नव्या वर्षात अगदी तुम्ही वेगवेगळ्या खास दिवशी या वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी भेट देऊन नवं वर्ष अगदी आनंदात सेलिब्रेट करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला नव्या वर्षाच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण नव्या वर्षात तुमचे प्रत्येक विकेंड एन्जॉय करता येईल. चला तर नव्या वर्षातील प्रत्येक खास दिवशी खास ठिकाणांची यादी जाणून घ्या. (Tourism)

  • 26 जानेवारी

जयपूर - जयपूरला ऐतिहासिक वासरा लाभला आहे. सोबतच हे शहर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. तेव्हा जानेवारी महिन्याच्या लाँग विकेंडसाठी तुम्ही जयपूरला जाऊ शकता. २६ जानेवारीच्या निमित्ताने तुमची हिस्टोरीकल ट्रिपही होईल आणि तुमचा एंजॉयदेखील होईल.

  • 18 फेब्रुवारी

या दिवशी महाशिवरात्री आहे. तेव्हा तुम्ही या निमित्ताने लाँग विकेंडसाठी महादेवचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी जाऊ शकता. तसेच तुम्ही जवळपासच्या ठिकाणांनाही भेट देऊ शकता. खालील दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षाचा विकेंड प्लान बघता येईल.

  • 8 मार्च

या दिवशी होळी हा सण आहे. या दिवशी तुम्ही निसर्गाचे सानिध्य अनुभवायला मिळणाऱ्या ठिकाणांना भेटी द्यायला हव्यात. यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या फुलांचे रंग आणि झाडांची पिवळसर पाने बघायला मिळतील. या काळात मथुरा बघण्यासारखी असते.(Travel)

  • 7 एप्रिल - या दिवशी गुड फ्रायडे आहे. तेव्हा तुम्ही सुट्टी प्लान करून तुमचा लाँग विकेंड एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणी जाऊन एन्जॉय करू शकता.

  • 29 जून - या महिन्यात बकरी ईदच्या निमित्ताने तुम्हाला लाँग विकेंड एन्जॉय करायला मिळेल. तेव्हा ही तारीख लक्षात घेऊन तुम्ही तुमचा लाँग विकेंड कसा क्रिएट करता येईल ते ठरवू शकाल.

  • 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही भारतातल्या कुठल्याही एतिहासिक ठिकाणी जाऊ शकता. त्यासाठी आतापासूनच तुम्ही तुमचा लाँग विकेंड प्लान करू शकता. दिल्लीच्या लाल किल्ल्यालादेखील तुम्ही या दिवशी भेट देऊ शकता. रात्रीचं दृष्य या दिवशी फार भारी असतं.

  • 19 ऑगस्ट - या दिवशी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. मात्र तुमच्या घरी गणपती बसत नसेल आणि तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तुम्ही या दिवशी गणपतीपुळे, पुण्याचा दगडूशेठ गणपती आणि आणखी बऱ्याच ठिकाणांना भेटी देऊ शकता.

  • 2 ऑक्टोबर - या दिवशी गांधी जयंती आहे. या दिवशी तुम्ही साबरमती व त्याजवळील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊ शकता. तसेच या दिवशी तुम्ही वर्ध्याच्या आश्रमालाही भेट देऊ शकता. या ठिकाणी गेल्यावर तुमचं मन प्रसन्न होईल.

  • 12 नोव्हेंबर - या दिवशी दिवाळी आहे. दिवाळीच्या प्रत्येकालाच निदान ३-४ दिवस सुट्ट्या असतात. तेव्हा तुम्ही आधीच तुमच्या टिकिट्स बुक करून निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊ शकता.

  • 25 डिसेंबर - या दिवशी ख्रिसमस असतो. या दिवशी तुम्ही गोवा, लोणावडा, खंडाळा अशा अनेक एन्जॉयेबल ठिकाणी जाऊन तुमची सुट्टी मजेत घालवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT