Mansoon In India esakal
टूरिझम

Monsoon In India : इथे घेता येईल मान्सूनचा दुप्पट आनंद , तेव्हा लगेच भेट द्या भारतातील या 6 ठिकाणांना

पर्यटन प्रेमींना त्यांच्या कुटुंबासह मान्सूनची मज्जा दुप्पट अनुभवायची असेल तर भारतातील या ठिकांना तुम्ही नक्की भेट द्यायला हवी आहे.

साक्षी राऊत

Mansoon In India : जूनच्या अखेरीस सगळे ज्याची आतुरतेने वाट बघताय तो पाऊस. भारतात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी लवकरच पावसाच्या आगमनाची शक्यता आहे. पर्यटन प्रेमींना त्यांच्या कुटुंबासह मान्सूनची मज्जा दुप्पट अनुभवायची असेल तर भारतातील या ठिकांना तुम्ही नक्की भेट द्यायला हवी आहे.

1) लोणावळा आणि खंडाळा : सह्याद्री पर्वतावर स्थित लोणावळा आणि खंडाळा मुंबई आणि पुण्याजवळील फेमस हिल स्टेशन आहे. हे ठिकाण पावसाळ्यात हिरव्या झाडाझुडपांमुळे आणि धबधब्यांमुळे सुंदर दिसते. येथील नॅचरल ब्युटी आणि जागेचं सौंदर्य या ठिकाणाला परफेक्ट मान्सून प्लेस बनवते.

Mansoon In India

2) शिलाँग, मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँग इथे मान्सूनदरम्यान मूसळधार पाऊस पडतो. ज्यामुळे येथील हिरवी झाडेझुडुपे आणि पर्वतरांगा बघण्यासारख्या असतात.

Mansoon In India

3) व्हॅली ऑफ फ्लॉवर, उत्तराखंड : व्हॅली ऑफ फ्लॉवर पावसाळ्यात फुलांच्या सौंदर्याने अगदीच मनमोहक दिसते. इथे भेट देण्यासाठी मान्सूनचा काळ सगळ्यात उत्तम आहे. पावसाळ्यात तुम्हाला इथे फुलांच्या रंगछटा बघायला मिळतात.

Mansoon In India

4) अलेप्पी, केरळ - बॅकवॉटरसाठी ओळखलं जाणारं अलेप्पी हाउसबोट क्रूज मान्सूनसाठी एक बेस्ट स्पॉट आहे. पावसाळ्यात इथे बॅकवॉटर संपूर्णपणे भरलेलं असतं. येथील संपूर्ण परिसर हिरवळीने भरलेला तुम्हाला दिसेल.

Mansoon In India

5) कूर्ग, कर्नाटक : कूर्ग, ज्याला कोडागू म्हणूनही ओळखले जाते, हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथे धुक्याने माखलेले डोंगर, खळखळणाऱ्या नद्या आणि धबधबे मनमोहक दिसतात. ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. (Tourism)

Mansoon In India

6) उदयपुर, राजस्थान : या शहराला सिटी ऑफ लेक असेही म्हटले जाते. शानदार महाल, चमचम करणारं तलावांचं पाणी आणि हिरवळीने माखलेले बगिचे यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. जून जुलैमध्ये ही ठिकाणं ठंडावतात. पावसाळ्यात हे शहर फार रोमँटिक दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT