Anuskura Ghat Konkan Tourism esakal
टूरिझम

Anuskura Ghat : घाटाच्या पायथ्याशी अवतरला स्वर्ग! पावसाळ्यात खुललं 'अणुस्कुरा'चं सौंदर्य, पर्यटकांसाठी मेजवानी

सार्‍या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार

सकाळ डिजिटल टीम

सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याचीही अनोखी संधी मिळते.

राजापूर : कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विविध कारणांनी विशेष महत्व आहे. तालुक्याचा पूर्व भाग असलेला पाचल परिसर कुशीमध्ये घेणारा अणुस्कुरा घाट (Anuskura Ghat) विविधतेने नटलेला सध्या निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघाला आहे.

येथील निसर्गसौंदयाचा आस्वाद घेण्यासाठी सध्या तो पर्यटकांना (Tourists) साद घालत आहे. उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे. घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतही पाहताना घाटाच्या पायथ्याशी स्वर्ग अवतरल्याचा भास होतो.

सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याचीही अनोखी संधी मिळते. अणुस्कुरा घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा या ठिकाणी अभाव आहे.

पर्यटकांना राहण्यासाठी चांगली लॉजिंग, हॉटेल्स, पर्यटकांना घाटाची माहिती देणारे गाईड, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गाड्यांची सुविधा यांची या ठिकाणी वानवा आहे. या सार्‍या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: भाजप-शिंदे गटात श्रेयवादावरून संघर्ष

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

SCROLL FOR NEXT