National Tourism Day esakal
टूरिझम

National Tourism Day : पुण्यातसुद्धा अनुभवता येणार तुम्हाला पाण्याखालचं जग

टेकड्यांनी वेढलेल्या या पुण्यात समुद्र नाही असंही काही लोक म्हणतात. पण त्याचीही कमतरता पुणेकरांनी भरून काढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

National Tourism Day 2023 : पुणे तिथं काय उणे असं म्हणतात ते काही उगाच नाही. इथे शिक्षण, इतिहास, संस्कृती, आधुनिकता, निसर्ग कशाचीच कमतरता जाणवत नाही. त्यामुळे इथे पर्यटण स्थळही भरपूर आहेत. पण टेकड्यांनी वेढलेल्या या पुण्यात समुद्र नाही असंही काही लोक म्हणतात. पण त्याचीही कमतरता पुणेकरांनी भरून काढली आहे.

पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी कँपिंग पासून ते समुद्राच्या आतल्या जगात फेर फटका मारण्यापर्यंतची सगळीच सोय पुण्यातच आहे. त्यामुळे पाण्याच्या खालचं आणि वरचं असे दोन्हीपण जग तुम्हाला या टेकड्यांनी वेढलेल्या पुण्यात आणि त्याच्या आसपासच अनुभवता येऊ शकतं. जाणून घेऊया.

पुण्याजवळ वॉटर स्पोर्ट्स करण्याचे ठिकाणं

अ‍ॅब्सोल्युट स्कुबा

हे ठिकाण पुणे शहरातच येरवडा इथे आहे. इथे अंडर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. तुम्हाला पोहता येत नसलं तरी तुम्ही हे अ‍ॅडव्हेंचर करू शकतात. यात पाण्याखालचे जीव, सौंदर्य, जग याचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात.

कायाकिंग वॉटर स्पोर्ट्स

हे ठिकाण पुण्याच्या जवळ आहे. इथे रिव्हर राफ्टींग, वाइल्ड ट्रेक यांचा आनंद घेता येऊ शकतो. इथे निसर्गाचा अगदी जवळून आनंद घेता येता.

पानशेत कॅम्पिंग

पानशेत बॅक वॉटर इथे कॅम्पिंग आणि वॉटर स्पोर्ट्सच्या दृष्टीने पर्यंटनाचे उत्तम ठिकाण आहे. शनिवार रविवारी इथे विकेंड घालवण्याची मजा लुटता येणार

वासोटा

वासोटा ट्रेक हा ट्रेकर्सचा आवडता विषय असून इथे केवळ ट्रेकच नाही तर जंगल ट्रेक आणि वॉटर स्पोर्ट्ससाठीही उत्तम पर्याय आहे. हे बामणोली जवळ आहे.

फिनकिक अ‍ॅडव्हेंचर

हे ठिकाणही पुण्यातल्या येरवडा इथे आहे. इथे तुम्हाला पाण्याखालचं जग अनुभवता येईल. इथे बनवलेल्या स्विमिंग पूल मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हीज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT