Reverse Waterfall Sadawaghapur esakal
टूरिझम

VIDEO : मनमोहक वातावरण अन् डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा; उलट्या धबधब्याच्या हंगामाला सुरुवात

सडावाघापूर (ता. पाटण) येथे संपूर्ण पावसाळा उलट्या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते.

यशवंतदत्त बेंद्रे

येणाऱ्या काळात अजून पर्यटकांना (Tourists) सुविधा दिल्या जाणार आहेत, असं मत उपवनसंरक्षक भारद्वाज यांनी उलटा धबधब्याच्या हंगाम प्रारंभावेळी व्यक्त केले.

तारळे : अतिशय अप्रतिम व डोळ्याचे पारणे फेडणारा धबधबा (Reverse Waterfall Sadawaghapur) आहे. याशिवाय परिसराला मनमोहक वातावरण व निसर्ग लाभला आहे. याचा पर्यटकांनी मनमुराद व शांत शिस्तीत आनंद लुटावा, असं आवाहन साताऱ्याच्या उपवनसंरक्षक अश्विनी भारद्वाज यांनी केले आहे.

यासाठी प्रतिमाणशी २० रुपये शुल्क आकारले जात असून, याचा वापर स्थानिक विकासासाठी केला जाणार आहे. सध्या यातून सुरक्षिततेसाठी पठारावर रेलिंग बसविले आहे. येणाऱ्या काळात अजून पर्यटकांना (Tourists) सुविधा दिल्या जाणार आहेत, असं मतही उपवनसंरक्षक भारद्वाज यांनी उलटा धबधब्याच्या हंगाम प्रारंभावेळी व्यक्त केले.

या वेळी सहायक उपवनसंरक्षक महेश वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल अशोक राऊत, सर्जेराव ठोंबरे, वनरक्षक रवींद्र कदम, संतोष यादव, महेश साळुंखे, रोहित गुरव, विशाल निखिल कदम, सडावाघापूर संयुक्त वनसमितीचे अध्यक्ष तथा सरपंच बापू दांडिले, पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सडावाघापूर (ता. पाटण) येथे संपूर्ण पावसाळा उलट्या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते. गर्दीमुळे बेशिस्त, हुल्लडबाजी, धंगडधिंगाणा वाढला होता, याला चाप बसावा, शिस्त यावी, महिला पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी प्रवेश नाका उभारला होता. तसेच माणसी प्रवेश कर आकारण्यात येऊ लागला.

उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) लहान, थोर, युवक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. त्याशिवाय येथील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आहे. धुके, विस्तीर्ण पठार, हिरवाईने नटलेला परिसर, थुई थुई येणारा पाऊस मन आणि तन चिंब करतो. अशामुळे येथे पर्यटकांची पावसाळ्यात प्रचंड गर्दी होत असते. मात्र तेवढीच प्रचंड बेशिस्त वाढली होती. त्यासाठी गत वर्षी येथे कासच्या धर्तीवर येथे एक प्रवेश नाका उभारला होता. आज या हंगामाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT