Revdanda Fort
Revdanda Fort Esakal
टूरिझम

Revdanda fort : पोर्तुगीजांचा रखवालदार रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांच्या पराक्रमापुढे फिका पडला!

सकाळ डिजिटल टीम

मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज सर्वात धाडसी आणि महान योद्धे होते. महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी लहान वयातच मोठे पराक्रम गाजवत स्वराज्याची पायाभरणी केली. छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे 360 किल्ले जिंकले. आज त्या किल्ल्यांची दुरावस्था झालीय हा एक वेगळा मुद्दा आहे.

हे किल्ले जिंकण्यासाठी महाराजांना योग्य वेळ पाहत नियोजन करत मुघल सैन्याचा करेक्ट कार्यक्रम आखला आणि त्यांना पळवून लावले. हे किल्ले मुघलांनी काही सहजा सहजी सोडले नाहीत. अनेक मावळ्यांना जीवाची बाजी लावावी लागलीय.  पण, एक किल्ला असाही भेटला की जो पोर्तूगिजांच्या तावडीतून स्वराज्यात आणायला मावळ्यांना दिड वर्षाचा कालावधी लागला. आजच्याच दिवशी १७४० मध्ये हा किल्ला मराठ्यांनी स्वराज्यात आणला.

त्या किल्ल्याचे नाव रेवदंडा किल्ला असून हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावात आहे. हा रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे असलेला एक प्राचीन पोर्तुगीज किल्ला आहे. रेवदंडा बीच हा एक वेगळा समुद्रकिनारा आहे आणि किल्ल्याजवळ आहे. हा किल्ला अलिबाग शहरापासून सुमारे १७ किमी आणि मुंबईपासून १२५ किमी अंतरावर आहे.

रेवदंडा किल्ल्याचा इतिहास

सहाव्या शतकात या ठिकाणी व्यापार वाढला होता. १० व्या शतकात निजामशाही नवाबांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे बंदर बनले. १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेवदंडाची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून ओळखली आणि हा किल्ला हस्तगत केला.

चौल मध्ययुगीन काळात सुमारे २००० वर्षाआधी भोज आणि बिंबदेव या राजांनी राज्य केले होते. चौल १४ व्या शतकात, १५ व्या शतकात बहामनी सुलतान, १६ व्या शतकात निजामशाही, १६/१७ व्या शतकात पोर्तुगीज असे सुलतान येथे येऊन गेले. १५०८ मध्ये, इजिप्शियन मामलुक आणि गुजरात सुलतान यांच्या संयुक्त सैन्याने पोर्तुगीज सुलतानचा पराभव केला.

निजामशहाच्या परवानगीने १५२१ मध्ये पोर्तुगीजांची पहिली वसाहत सुरू झाली. १५७०-७१ आणि १५९४ मध्ये अनेक आक्रमणांपासून पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे रक्षण केले. १७४० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८०६ मध्ये हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला.

रेवतीक्षेत्र असेही म्हणतात

भारतीय पौराणिक कथेनुसार हे ठिकाण पूर्वी रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जात असे. इतिहासात असे बोलले जाते की भगवान कृष्णाने हे स्थान बलरामाच्या पत्नीला त्यांच्या विवाह सोहळ्यात रेवती म्हणून ओळखले आणि नंतर तिच्या नावावरून रेवतीक्षेत्र असे ठेवले.

रेवदंडा किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे

रेवदंडा किल्ला हा एक जीर्ण अवस्थेत असलेला किल्ला आहे. किल्ल्याचा परिघ सुमारे ५ किमी आहे. संपूर्ण तटबंदीला दोन मुख्य दरवाजे आहेत एक उत्तरेकडून आणि दुसरा दक्षिणेकडून. त्यांपैकी उत्तरेकडील दरवाजा जमिनीच्या जोडणीसाठी आणि दक्षिणेकडील दरवाजा समुद्राला जाण्यासाठी वापरला जात असे. हा मार्ग रेवदंडा खाडीतून मुख्य समुद्राला जातो.

उत्तर आणि दक्षिण दरवाजा थेट दगडांनी बनवलेल्या एका लांब रस्त्याने जोडलेला आहे. आता, कंपाऊंडच्या फक्त पश्चिमेकडील भागात प्राचीन किल्ल्याचे काही अवशेष आहेत. उरलेला भाग कालांतराने घरे आणि शेतजमिनी असलेले रेवदंडा गाव बनले आहे. रेवदंडा बीचवरील वाळू काळ्या रंगाची आहे.

किल्ल्याला ४ मजली बुरुज आणि त्याच्या भिंतीमध्ये दोन तोफा आहेत. मुख्य भिंतींच्या खाली एक जुना रस्ता आहे. जो सध्या बंद आहे. रेवदंडा हे भारतातील पहिले ठिकाण होते जेथे अफनासी निकितिन हा पहिला रशियन प्रवासी उतरला होता. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोर्‍याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोर्‍याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोर्‍यावरुन उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिर्‍यापर्यंत टेहाळणी करता येत असे.

कसे पोहोचाल

विमान - मुंबई विमानतळ जवळ आहे.

रेल्वे - पेण, कोलाड, नागोठणे हे रेल्वे स्टेशन्स आहेत.

रस्ता - मुंबई आणि पुणे येथून राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT