माँ जिजाऊ
माँ जिजाऊ  माँ जिजाऊ
टूरिझम

ऐतिहासिक, पर्यटन स्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्म बुलडणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे झाला. आज मातृतीर्थ हे ऐतिहासिक स्थळ नाही तर पर्यटनस्थळ म्हणून सुद्धा जगभर प्रसिद्ध झाले आहे. जगभरातून हजारो लोक सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात. राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला राजवाडा, रंगमहाल, काळाकोट, लखुजीराजे समाधी, मोती तलाव, चांदणी तलाव, पुतळा बारव, सजना बारव, बाळसमुद्र, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, सावकार वाडा यासह अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळत आहे.

लखुजी राजे यांचा राजवाडा

लखुजी राजांच्या राजवाड्याची गढीचे प्रवेशद्वार तीन मजली आहे. खाली घेवडा त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षण भिंती उभारलेला सज्जा असे दरवाजे स्वरूप आहे. याच राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता. प्रवेशद्वाराची दर्शनी चौकट दगडी असून अतिशय मजबूत आहे. या दगडी चौकटीवरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे. दगडी कमानीच्या दोन्ही अंगास दोन खेळणी कमळाची तपके कोरलेली आहेत.

दगडी नारळाचे तोरण चौकटीवर

दगडात कोरलेले चौदा नारळ म्हणजे कारागिरीची दुर्मीळ नमुना म्हणावा लागेल. आता फक्त दोनच नारळाच्या शिल्पाकृती मूळ स्वरूपात कायम असून अन्य नारळ महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने १९७४ साठी लावलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या इमारतीची एकूण उंची ११.६५ मीटर आहे. राजवाड्याच्या पश्चिमेस लागूनच कृत्य महाल किंवा कंपनीचा महाल या नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे.

मोती तलाव

मोती तलाव म्हणजे शिवकालीन विदर्भातील जलायांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा तलाव राव जगदेवाने बांधलेला असून त्यासाठी सहा लक्ष रुपये खर्च आल्याची बखरीत नमूद केले आहे. या तलावाच्या मुख्य हेतू नजीकच्या भागातील शेतीला पाणीपुरवठा करणे हा दिसतो. शेती तलावातून पूर्वेकडे वाहणाऱ्या पाण्याचा दान सडके खाली शेतीला भिजवताना आजही दिसतो. बंधाऱ्याची भिंत २५८ मीटर लांब व ३.५ मीटर पासून १८ मीटरपर्यंत रुंदी आहे. घराची भिंत पक्क्या दगडांनी बांधलेली असून बांधकामात वापरलेल्या दगड प्रामुख्याने जुन्या हेमाडपंथी मंदिराच्या बांधकामाचे दिसतात.

सजना बारव

चांदणी तलावाच्या लागूनच असलेले पूर्वेकडील विहीर म्हणजे सजना बारव मजबूत दगडी बांधकाम केलेली. ही बारव मन मोहून टाकते. चिरेबंदी बांधणीच्या या गोलाकार विहिरीचा व्यास ९.९० मीटर आहे. एकूण खोली १३.७० मीटर असून, विहिरीच्या आत जाण्यासाठी पूर्वेच्या अंगाने पायऱ्या खोदलेल्या आहेत. विहिरीवर दोन मोठा चालत विहिरीच्या उत्तर गाने २ काढून स्नानगृहाची व्यवस्था केलेली दिसते.

पुतळा बारव

राजवाड्याच्या ईशान्य सुमारे अर्धा किलोमीटरवर पुतळा बारू पाहायला मिळते. ही बारव लखुजीराजे जाधवांच्या पूर्वीची असून तिचे बांधकाम १२ व १३ वे शतक यादरम्यान झालेले आहे. बारव गोलाकार नसून अष्टकोनी दिसते. पूर्व-पश्चिम लांबी २०.७० मीटर आहे. पाण्यात उतरण्यासाठी पूर्व पायऱ्या काढलेले आहेत. पुतळा बार्बीचा वरचा घाट बांधकामाच्या दृष्टीने दुर्मीळ स्वरूपाचा आहे. सर्व बांधकाम दगडी असून त्यावर अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत.

काळाकोट

राजवाड्याच्या साधारणतः वायव्य सुमारे ३०० मीटर अंतरावर काळा कोट उभा आहे. काळा कोट म्हणजे सिंदखेडकर जाधव रावांच्या अर्धवट साकार झालेले स्वप्न म्हटले पाहिजेत. लखुजी जाधवांचा खापरपणतू राव जगदेव याने काळाकोटाचे बांधकाम सुरू केले होते. १०३.२० बाय ८५.१०मीटर क्षेत्रफळ असलेल्या प्रशस्त जागेवर एक बलदंड भुईकोट बांधायला घेतला. परंतु त्यांच्या तटबंदीने बांधकाम जेमतेम निम्म्यावर आले आणि मोगल बादशहाने पुढील बांधकाम करण्यास मनाई केली. संभाव्य धोका लक्षात आल्याने बादशाह सतर्क झाला जाधवराव बंड पुकारतील अशी धास्ती त्याला वाटली व त्यामुळे लगेच काय फुटाचे बांधकाम त्याने बंद पाडले.

लखुजी राजांची समाधी

राजे लखुजीराव जाधवांचे समाधिस्थळ येथे आहे. ही भव्य वस्तू भारतातील हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरुषांच्या समाधीमध्ये शिल्प दृष्ट्य़ा अत्यंत प्रेक्षणीय असलेले असे समाधी क्वचित आढळते. अत्यंत सुबक व प्रमाणशीर असलेल्या चिरेबंदी वास्तूची लांबी व रुंदी समान चौरसाकार असून ती प्रत्येक १६.४० मीटर भरते भिंतीची उंची १४.५० मीटर आहे. वास्तूची बांधकाम कमानी घाटाचे असून एकूण चोवीस कमानीवर वास्तव भरलेली दिसते. २५ जुलै १९२९ रोजी निजामाने लखुजी राजांचा पुत्र पत्रासह दौलताबादची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडात लखुजी सोबत त्यांचे रघुजी व सनोजी हे दोन पुत्र व यशवंतराव हा त्यांचा एक नातू मारला गेला. या घटनेनंतर लगेच या समाधी स्थानाचे बांधकाम लहुजींचे बंधू जगदेवराव यांनी सुरू केले. या अप्रतिम स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी कृष्ण कारागिराने उचलली. त्यांच्या दिमतीला एकवीस कारागीर दिले होते. तिसऱ्या दिवशी एक मोहर याप्रमाणे कृष्ण कारागिराची मजुरी पुतळ्यासाठी ठरली. स्मारक उभारण्यासाठी एकूण १० वर्षे लागली. त्यापैकी ३ वर्ष केवळ लखुजी राजांच्या पुतळ्यासाठी लागली.

गंगासागर

रामेश्वर मंदिराच्या दक्षिणेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर गंगासागर बारव आहे. बारा अष्टकोनी असून दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. विहिरीचा व्यास सुमारे १०.६० मीटर असून, अष्ट कोणाचा एका कोणाची लांबी ४.४० मीटर आहे.

रंग महाल

रंग महालाचे बांधकाम पूर्णता विटाची असून चौथरा मात्र दगडी आहे. राजवाड्याच्या रानी महालाची छोटी प्रतिकृती म्हणजे रंग महाल होय. पारंपरिक दंतकथेनुसार एका रंगपंचमीला जिजाऊ व शहाजी यांनी बालपणी एकमेकांवर रंग उडवला व लखुजी राजांनी जोडा छान शोभतो असे उद्गार काढले तो हा रंगमहाल होय. रंग महाल म्हणजे जाधवरावांची न्याय कचेरी असल्याचे सांगितले जाते.

कसे पोहोचाल?

  • विमानाने :- औरंगाबाद येथील विमानतळ ९२ किमी अंतरावर आहे.

  • रेल्वेने :- जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानक अनुक्रमे ३३ व ९६ कि.मी अंतरावर आहे

  • रस्त्याने :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकामधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT