chowanmalla palace chowanmalla palace
टूरिझम

हैदराबादचा चौम्ल्ला पॅलेस आहे सुंदर; जाणून घ्या इतिहास !

प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये तयार केलेले हा राजवाडा आहे

भूषण श्रीखंडे

जळगाव ः भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कोलकाता, कर्नाटक येथे या राज्यांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये तयार केलेले अनेक राजवाडे (palace) आहे. तेथील सौंदर्य पर्यटकांना (Tourists) नेहमी आवडत असते. असच काहीशी गोष्ट हैदराबादमधील चौमल्ला पॅलेसबाबत (chowmahalla palace hyderabad) आहे. नबाबस शहरातील हा वाडा हैदराबादचे पर्यटन स्थळापैंकी एक महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. चला मग जाणून घेवू या चौमल्ला पॅलेसबाबत..(know-about-chowmahalla-palace-hyderabad-history)

पॅलेसचा असा आहे इतिहास

हैदराबादच्या पाचव्या निजाम अफझल-उद-दौला आणि असाफ जहां व्ही. यांच्या कारकिर्दीत हा सुंदर राजवाड्याचे बांधकाम केले. राजवाड्याचे बांधकाम केवळ 1750 मध्येच सुरू झाले होते परंतु काही कारणांमुळे ते पूर्ण होवू शकले नाही. मग नंतर ते 1857 ते 1895 दरम्यान पून्हा बांधला गेले. राजवाड्यांचे बांधकाम आश्चर्यकारक असून त्याची शैली, कोरीव व नक्षीदार कामासाठी भारतात हा राजवाडा प्रसिध्द आहे.

chowanmalla palace

रचना वैशिष्टपूर्ण

हा राजवाडा सुमारे 45 एकरांवर बांधला गेले होता, परंतु हळू हळू हा राजवाडा बारा एकर क्षेत्रात राहीला आहे. दोन विभागात हा राजवाडा दोन विभागला असून यात उत्तरेकडील भाग, आणि दुसरा दक्षिणकेडील भाग आहे. पहिल्या भाग (उत्तर भाग) इमाम साल्ट रूम्सचा एक लांब कॉरिडोर, दरबार हॉल, काचेच्या मध्ये बांधलेला गेस्ट हाऊस आहे. तर दक्षिणेकडील भागात महताब महाल, तहानियात महल, अफजल महल आणि आफताब महल अशी चार राजवाडे आहेत.

chowanmalla palace

खिलाफत मुबारक भवन

'खिलाफत मुबारक भवन' चौमल्ला पॅलेसचे हृदय असून येथे निजामाची गादी असायची असे म्हणले जाते. हैदराबादमधील लोक या जागेचा अत्यंत आदर करतात. या इमारतीत निझामासाठी संगमरवरी गद्दी तख्त-ए-निशान यांनी बांधलेले बांधकाम. बाजूलाच रोशन बंगला असून तेथे निजाम संध्याकाळी फिरायला जायचे. या वाड्याचे काही भाग आता हेरिटेज हॉटेल्समध्ये रूपांतरित झाले आहेत.

राजवाड्याबद्दल इतर माहिती

या राजवाड्याच्या मुख्य गेटच्या वर एक घड्याळ असून त्याला नागरिक 'खिलवत क्लॉक' असे म्हणतात. असे म्हतले जाते की ही घड्याळ जवळजवळ दोनशे वर्षांपासून सतत चालू आहे. २०१० मध्ये चौम्हल्ला पॅलेसची निवड ‘युनेस्को एशिया पॅसिफिक मेरिट’ आयोजित सांस्कृतिक वारसा जतन पुरस्कारासाठी झाली. हा राजवाडा सकाळ ते सायंकाळ पर्यंतसाठी सर्वांसाठी खुला असतो.

(know-about-chowmahalla-palace-hyderabad-history)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT