Hot Air Balloon Ride esakal
टूरिझम

Hot Air Balloon राइडचा आनंद घ्यायचा आहे? 'ही' आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं

सकाळ डिजिटल टीम

हॉट एअर बलून राइडचा (Hot Air Balloon Ride) रोमांच अनुभवनं हा परदेशी पर्यटकांप्रमाणेच देशांतर्गत पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

ऑक्टोबर महिन्यात ना जास्त उष्णता असते, ना थंडी... हा महिना सुरू होताच शरद ऋतूतील निसर्गाच्या अनेक छटा अनुभवता येतात. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फिरायची हौस असणाऱ्यांसाठी हा हंगाम सर्वोत्तम आहे. या काळात तुम्ही साहसी सहलींना देखील जाऊ शकता..

हॉट एअर बलून राइडचा (Hot Air Balloon Ride) रोमांच अनुभवनं हा परदेशी पर्यटकांप्रमाणेच देशांतर्गत पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. उंचीवरुन निसर्ग न्याहाळण्याचा आनंद हॉट एअर बलूनच्या माध्यमातून घेता येतो. आज आपण पाहूया, हॉट एअर बलूनचा आनंद घेण्यासाठी आपण नेमकं कुठं जाऊ शकतो.

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) - हिमाचल प्रदेशातील 'मनाली' हे हॉट एअर बलून राइडसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जर ही राइड तुम्ही संध्याकाळच्या वेळी करत असाल, तर ती अधिक मजेदार बनते. सूर्यास्तावेळी उंचावरून डोंगरदऱ्या न्याहाळण्याचा स्वर्गीय अनुभव तुम्ही येथे घेऊ शकता. साधारणपणे एक तासाच्या काळातील ही राइड संस्मरणीय ठरणार हे नक्की.

महाराष्ट्र (Maharashtra) - सह्याद्रीच्या डोंगररांगाचं वरदान लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रातही तुम्ही या राइडचा आनंद लुटू शकता. ही राईड लोणावळ्यात उपलब्ध आहे. तब्बल ४००० फूट उंचीवरुन निसर्ग अनुभवण्याचा आनंद निराळाच. जंगलापलीकडच्या शहरातील उंच-उंच इमारतीचं दृश्यही इथून अनुभवता येतं.

Himachal Pradesh Hot Air Balloon Ride

गोवा (Goa) - गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरुन हॉट एअर बलून राइडचा आनंद लुटणे हा एक सुखद अनुभव होऊ शकतो. बलून राइडसाठी हा महिना उत्तम आहे. किनाऱ्यापासून उंच जाऊन समुद्राच्या लाटांना पाहणं निश्चितच मनाला प्रसन्न करेल.

दिल्ली एनसीआर (Delhi NCR) - येथेही तुम्ही या राइडचा आनंद घेऊ शकता. फरीदाबाद शहराजवळील दमदमा तलावावर तुम्ही या रोमांचकारी सवारीचा आनंद घेऊ शकता. आपण येथे बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

Goa Hot Air Balloon Ride

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT