Amitabh Bachchan esakal
Trending News

Amitabh Bachchan : 'भारत माता की जय' म्हणत अमिताभ बच्चनने शेअर केला व्हिडीओ, बघून तुम्हीही म्हणाल...

“India the Mother of invention ..” असे म्हणत अमिताभने मोठ्या गर्वाने हा व्हिडीओ शेअर केलाय

साक्षी राऊत

Amitabh Bachchan Shared Video : बॉलीवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अमिताभ बच्चनने सोशल मीडियावर 'भारत माता की जय' असे कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओने अनेकांचे मन जिंकले आहे. अमिताभ बच्चत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. “India the Mother of invention ..” असे म्हणत अमिताभने मोठ्या गर्वाने हा व्हिडीओ शेअर केलाय. अगदी काही मिनिटांतच या व्हिडीओला लाखांत लाइक्स मिळालेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे फारच कठीण होऊन बसते. अशातच यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी व्हिडीओमधील व्यक्तीने एक शक्कल लढवली. डोक्यावर पंखा आणि मागे सोलर प्लेट घेऊन हा संन्यासी व्यक्ती रस्त्याने फिरत होता. एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच अभिनेता अमिताभ बच्चनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडीओ शेअर केल्याच्या अगदी काही मिनिटांतच या व्हिडीओला लाखो लाइक्स मिळालेत. अनेकांनी या व्हिडीओमधील व्यक्तीचं कौतुक केलंय. तसेच 'भारत माता की जय', 'आपल्या भारतातील टेक्नॉलॉजी काय प्रगत होती', 'या व्यक्तीला सलाम' असे कमेंट्स यूजर्सनी या व्हिडीओवर केले आहेत.

व्हिडीओमधील व्यक्तीला या पंख्याबाबात सविस्तर विचारलं असता त्यांनी या पंख्याची खासियत सांगतली. हा अगदी नैसर्गिक स्त्रोतावर म्हणजेच उन्हावर चालतोय. संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत हा पंखा उन्हाच्या उर्जेवर चालतो. तसेच जेवढी जास्त उन असेल तेवढी चांगली हवा हा पंखा देतो. असे या व्यक्तीने सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT