ahmedabad plane crash students jumped from building viral video esakal
Trending News

Plane Crash New Video : अहमदाबादमध्ये विमान कोसळलं अन् विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून मारल्या उड्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Ahmedabad plane crash students jumped from building viral video : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात बीजे मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी थेट बाल्कनीतून उड्या मारल्या, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Saisimran Ghashi

Viral Video : अहमदाबादमध्ये १२ जूला झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाच्या AI 171 या विमानाने बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीवर कोसळले. या धक्कादायक घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता त्यानंतर दूसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे

या व्हिडिओत दिसते की, अपघातानंतर मेसमध्ये अफाट गोंधळ उडाला. प्रचंड आवाजात स्फोट झाला आणि इमारतीचा एक भाग कोसळला. त्या वेळी मेसमध्ये जेवत असलेले अनेक एमबीबीएस विद्यार्थी आणि कर्मचारी प्रचंड घाबरले. गोंधळलेल्या आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नात अनेकांनी थेट इमारतीच्या बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. हे दृश्य पाहणाऱ्यांचे अंगही थरथर कापू लागते.

स्फोटानंतर काही सेकंदांतच संपूर्ण मेस धुराने व्यापली होती. कोणालाही काय घडले हे समजण्यापूर्वीच लोकांनी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी धावाधाव सुरू केली. बाहेरून मिळालेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसते की काही लोक खाली पडल्यावरही उठून धावत सुटले तर काही गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी हाका मारत होते. या प्रसंगातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे धाडस त्यांनी केवळ स्वतःचे प्राण वाचवले नाहीत, तर इतर जखमी लोकांनाही मदत करण्याचा प्रयत्न केला.

या विमान अपघातात एकूण किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले, याची अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली तरी हा अपघात गुजरातमधील एक भयावह आठवण म्हणून कायम राहणार आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा प्रसंगावधान आणि धैर्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या सोशल मीडियावर फिरणारा हा बाल्कनीतून उड्या मारणाऱ्या लोकांचा व्हिडिओ, फक्त या अपघाताची भयावहता दाखवून देत नाही, तर जीवाच्या आकांतातही माणूस काय करू शकतो, हेही दाखवून देतो. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे आणि भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी विमान वाहतूक आणि नागरी सुरक्षेबाबत नव्याने धोरणं तयार केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC : राहुल गांधींना शपथपत्र देण्यास का सांगण्यात आलं? निवडणूक आयोगाने सांगितलं कारण...

Mother’s Milk Benefits: जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध का गरजेचं आहे? तज्ज्ञ सांगतात कारणं

Explainer : काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? प्रत्येक तरुणाला मिळणार १५ हजार रुपये, अर्ज कसा कराल? वाचा A टु Z माहिती

Ahilyanagar News: 'खासदार निलेश लंके वाहतूक कोंडी साेडवण्यासाठी उतरले रस्त्यावर'; अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर वाहनांची गर्दी

दुहेरी हत्याकांडानं बदायूं हादरलं! जमिनीच्या वादातून आई-मुलीची चाकूने भोसकून हत्या; घराबाहेर झोपलेल्या भावावरही हल्ला, मध्यरात्री काय घडलं?

SCROLL FOR NEXT