Texas Mall Shooting esakal
Trending News

Texas Mall Shooting : ती गेली पण आठवणी जीवंत! टेक्सास मॉलमध्ये झालेल्या अटॅकमध्ये जीव गमावणारी ऐश्वर्या

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऐश्वर्याने तिच्या मूळ शहराला भेट दिली. पण कोणास ठाऊक, ती भेट शेवटची ठरेल

सकाळ डिजिटल टीम

Texas Mall Shooting : 2022 मध्ये ऐश्वर्याने तिच्या शहराला दिलेली भेट ही शेवटची ठरेल अशा विचारही तिच्या कुटुंबियांनी कधी केला नसेल. 18 मे रोजी, ऐश्वर्या 28 वर्षांची झाली असेल. टेक्सास मॉलमध्ये झालेल्या फायरींगमध्ये ऐश्वर्या मारली गेली होती. तिच्या जुन्या आठवणी आठवताना तिच्या मैत्रिणींचे हृदय दु:खाने भरून आले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऐश्वर्याने तिच्या मूळ शहराला भेट दिली. पण कोणास ठाऊक, ती भेट शेवटची ठरेल.

हैदराबादमधील 27 वर्षीय ऐश्वर्या थाटीकोंडा ही सिव्हिल इंजिनिअर 2019 पासून यूएसमध्ये होती. आधी ती पदवी घेण्यासाठी यूएसला गेली आणि तिथेच तिला नोकरीही लागली.

तिच्या आठवणीत भावूक होताना तिच्या मैत्रिणींनी तिच्या उदार मनाचे आणि करूण व्यतिमत्वाचे काही किस्से सांगितले. ती कायम मदतीसाठी तयार असायची. जेव्हा ती अमेरिकेत गेली तेव्हा गरजूंना मदत करण्यासाठी तिने मैत्रिणींच्या एनजीओला मदत करण्याचे वचन दिले होते. तिने ते वचन पाळलेही. दोन वर्षांपूर्वी तिला नोकरी मिळाल्यानंतर तिने एनजीओसाठी देणगी देण्यास सुरुवात केली. पुढे त्या सांगतात, आम्हाला अजूनही आठवतं की तिने गरजू विद्यार्थ्यांची फी भरली तसेच अनेक घरी किराण्याच्या पिशव्यासुद्धा पोहोचवल्या. (Texas Shooting)

तिचा बालपणीचा मित्र विकास साई याला ऐश्वर्याचा जाण्याचा गंभीर झटका बसलाय. टेक्सास मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेत त्याच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा जीव (Murder) गेलाय हे दु:ख तो अजूनही पचवू शकला नाहीये.

त्याने तेलंगणाचे सीएमओ आणि मंत्री केटी रामाराव यांना केलेले ट्विट, “ऐश्वर्या ही माझी बालपणीची मैत्रिण आहे, तिचे पार्थिव कृपया हैद्राबादला त्वरीत हस्तांतरित करावे” त्याच्या या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्वरीत यावर रिप्लाय करून आम्ही याकडे जबाबदारीने लक्ष घालू असे म्हणत प्रतिसाद दिला.

ऐश्वर्या ही एक धाडसी मुलगी होती. ती इतकी धाडसी होती की तिच्या मित्रांनी तिचे नाव रावडी ठेवले होते. कोणाचे चुकले असल्यास तिने कायम तिची योग्य बाजू मांडण्यासाठी संघर्ष केला. तिच्या भावाच्या लग्नासठी ती होमटाऊनला आली ती तिची शेवटची भेट ठरेल हे कोणालाच वाटले नव्हते.

ऐश्वर्याचे अमेरिकेचे सगळे मित्र तिच्या मृत्यूनंतर चिंतेत होते. ही थरारक घटना जेव्हा घडली तेव्हा तिचे तीन मित्रसुद्धा या घटनेत जखमी झाले होते. अमेरिकेतील तिचे मित्र तिला शोधण्यासाठी धडपडत होते. तिचा मित्र श्रेयस रेड्डी हा देखील या घटनेत जखमी झाला होता. या थरारक घटनेनंत यूएसएला जाणे खरोखरच सुरक्षित आहे का अशी भिती तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

SCROLL FOR NEXT