Bihar’s Anubhav Shashwat and Russian architect Anastasia tie the knot at Katihar temple, symbolizing a union of two cultures in a traditional Indian ceremony.  esakal
Trending News

Love Marriage in Bihar : बिहारीबाबूची रशियन ‘लुगाई’ ; जाणून घ्या, प्रेम ते लग्नापर्यंतची ‘फुलस्टोरी’!

Bihar doctor Anubhav Shashwat and Russian architect wedding : बिहारमधील कटिहारच्या दुर्गा देवी मंदिरात झालेला विवाह सर्वत्र चर्चेत; जाणून घ्या, दोघांच्याही कुटुंबाची काय होती प्रतिक्रिया?

Mayur Ratnaparkhe

Love Beyond Borders: Doctor from Bihar Marries Russian Architect : बिहारमधील कटिहार येथे एका मंदिरात पार पडलेला एक अनोखा आणि तितकाच हृदयस्पर्शी विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. डॉक्टर अनुभव शाश्वत यांनी रशियन वास्तुविशारद अनास्तासिया हिच्याशी भारतीय पंरपरेनुसार मंदिरात विधीवत लग्न केले आहे. तर मुलाचे कुटुंब परदेशी सूनबाई आल्याने खूप आनंदी दिसत आहेत. या विवाहसोहळ्याला ते एक सुंदर सांस्कृतिक संगम मानत आहेत.

हा चर्चेतील विवाह बिहारमधील कटिहारच्या दुर्गामाता मंदिरात सनातन धर्माच्या पूर्ण वैदिक विधींनुसार पार पडला. दोघांनी मंदिरात एकमेकांसोबत सात फेरे घेतले आणि सातजन्म एकत्र राहण्याचे एकमेकांना वचनही दिले. रशियन मुलगी अनास्तासिया वास्तुकलेचे शिक्षण घेत आहे. तर  अनुभव शाश्वत डॉक्टर आहेत.

कटिहारमधील नवाबगंज येथील अनुभव शाश्वत २०१७ मध्ये रशियातील एका विद्यापीठात एमबीबीएस शिकण्यासाठी गेले होते. त्यांच्या शिक्षणादरम्यान त्यांची २०२० मध्ये रशियातील अनास्तासिया हिच्याशी ओळख झाली. तेव्हा अनास्तासिया रशियातील एका विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती. सुरुवातीला दोघेही चांगले मित्र बनले होते.

यानंतर करोना काळात दोघेही खूप जवळ आले. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. इकडे  एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२२ मध्ये अनुभव हे डॉक्टरच्या पदवीची परवाना परीक्षा देण्यासाठी भारतात आले. अनुभव हे भारतात आल्यानंतरही ते दोघेही सतत संपर्कात राहिले. त्यानंतर अनास्तासिया देखील भारतात आली.

अनुभव शाश्वत यांनी अनास्तासिया हिला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्याच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. यानंतर, अनुभव यांनी विचारले की तिला येथील गोष्टी आवडतात का? ती इथल्या वातावरणात राहू शकते का? तसेच त्यांनी तिला विचार करण्याची संधी दिली आणि सारासार विचार करून निर्णय घेण्यास सांगितले.

अखेर प्रेम जिंकले आणि अनास्तासियाला भारत आवडल्याने तिने अनुभव यांच्याशी लग्न करण्यास होकार दर्शवला. यानंतर, अनुभव यांनी तिच्या कुटुंबाशीही याबाबत चर्चा केली, त्यांनीही लग्नाला संमती दिली. त्यानंतर, दोघांनीही कटिहारच्या दुर्गामाता मंदिरात भारतीय परंपरेनुसार लग्न केले. आता लग्नानंतर अनास्तासिया खूप आनंदी आहे. दुसरीकडे, अनुभव शाश्वत यांचे कुटुंबीय देखील अनास्तासियाच्या वागण्यावर खूप खूश आहेत. कुटुंबातील सदस्य अनास्तासियाला प्रेमाने नास्तिया म्हणून संबोधतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : कणकवली शहरात चोरट्यांची दहशत; तब्बल ८ दुकाने फोडली

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT