A shocking moment captured at a wedding ceremony where the bride was reportedly shot after her alleged lover opened fire on the stage, causing panic among guests.

 

esakal

Trending News

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Bride shot by deranged lover during ceremony : या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे ; जाणून घ्या, कुठं घडली घटना?

Mayur Ratnaparkhe

Bride Shot During Wedding Ceremony : बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका माथेफिरूने भर विवाहसमारंभात स्टेजवर असणाऱ्या वधूवर गोळी झाडली आहे.

एकीकडे नववधूचे औक्षण सुरू होते, आनंदी वातावरण होतं, गाणीही सुरू होती अन् तेवढ्यातच त्या माथेफिरूने गर्दीत जाऊन कोणालाही काही समजण्याच्या आत स्टेजवर उभ्या असलेल्या त्या नववधूवर गोळी झाडली. यानंतर ती नववधू जागीच कोसळली. ज्यामुळे लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, वधू आणि वर स्टेजवर उपस्थित आहेत, तर संपूर्ण कुटुंब लग्नाचा आनंद साजरा करत आहे. दरम्यान, हार आणले जातात आणि वर वधूला देतो. विधी सुरू होताच, एक वेडा स्टेजजवळ येतो आणि वधूवर पिस्तूलातून गोळी झाडतो.

सुरुवातीला, जवळचे लोक काय घडले हे समजू शकत नाहीत, परंतु तिला गोळी लागली आहे हे लक्षात येताच, सर्वजण तिच्याकडे धाव घेतात आणि पाहुणे स्तब्ध होतात. वधू देखील स्टेजवर कोसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण एकतर्फी प्रेमाचं आहे. लग्नाचं वऱ्हाड हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून आलं होतं. रात्री साधारण साडेदहा वाजता, वरमाला समारंभाच्या वेळी वधूच्या घराच्या शेजारी राहणारा तरूण तिथे आला आणि त्याने वधूच्या पोटात गोळी झाडली. गोळी तिच्या नाभीजवळ लागली, ज्यामुळे ती कोसळली. यानंतर कुणालाही काही लक्षात येण्याआधीच तो माथेफिरू प्रियकर घटनास्थळावरून तत्काळ पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT