Success Story
Success Story esakal
Trending News

Success Story : राखेतून फिनिक्स भरारी ! बुडलेली केचअप बनवणारी कंपनी आज विकते 5 हजार प्रोडक्ट्स

सकाळ डिजिटल टीम

Business Success Story : कुणाच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये, कुणाच्या मध्यात, तर कुणाच्या उत्तरार्धात संघर्ष असतो. हेन्री हाईंज... अर्थात, ‘हाईंझ केचप’ या जगप्रसिद्ध ‘टोमॅटो केचप’चा निर्माता. याच्या आयुष्यात असाच काहीसा संघर्ष होता. कंपनी यशस्वीरित्या सुरु केली प्रगतीही झाली. मात्र सगळं एका झटक्यात बुडालं. आज ही प्रसिद्ध केचअप कंपनी जवळपास साडेपाच हजार प्रोडक्ट्स बनवते. जाणून घेऊया कंपनीची सक्सेस स्टोरी.

हेन्रीचे वडिल आणि आई दोघेही जर्मन. वडील तरुणपणातच आपला चांगला बिझनेस सोडून अमेरिकेला स्थायिक झाले. हेन्री त्यांचं पहिलं अपत्य. तो लहानपणापासूनच हुशार होता. तो सात वर्षांचा असल्यापासून वडिलांच्या शेतीवर काम करत असे. दिवसभर तो मेहनत करायचा.

Success Story

त्याच्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्याच्या नावावर बारा एकर शेती केली. या शेतीत हेन्री भाज्या आणि फळे पिकवत असे. त्याची आई उत्कृष्ट लोणची बनवत असे. हेन्रीनेदेखील लोणची बनवून विकायला सुरुवात केली. त्याचा पार्टनर नोबेल आणि त्याने ‘हाईंझ ॲण्ड नोबेल’ ही कंपनी सुरू केली. हेन्री अतिशय चांगला उद्योग करू लागला. त्याची आई त्याला नेहमीच प्रोत्साहन देत असे. जरा कधी तो निराश झाला की, त्याची आई त्याला पुन्हा उभे राहायला ऊर्जा देत असे. हेन्रीचा उद्योग चांगला चालू असतानाच एके वर्षी असे काही झाले की, आर्थिक मंदीमुळे त्याला आपला उद्योग विकावा लागला.

हातात आलेले सर्व काही गेले. तो इतका गरीब झाला की, त्यावर्षीच्या ख्रिसमसला मुलांना भेटवस्तू द्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. या धक्क्याने हेन्री आजारी पडला. त्याने अंथरूण धरले. त्याच्या आईने न डगमगता आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढायचे ठरवले. ती त्याचे मनोबल वाढवत राहिली. हेन्रीने आपल्या आईची प्रसिद्ध पाककृती वापरून टोमॅटोचे सॉस बनवले. अमेरिकन लोक एकेकाळी टोमॅटोला विषारी समजत असत. हेन्रीच्या काळात लोकांच्या मनातील ती भीती जवळजवळ गेली होती. परंतु, पुरती संपली नव्हती. मग हेन्रीने त्याच्या सॉसच्या बॉटल्स काचेच्या बनवल्या. या पारदर्शक बॉटल्समधून लाल रंगाचे सॉस दिसत असे आणि ग्राहक त्याकडे आकर्षित होत असे. (Company)

मात्र, कालांतराने हे केचप थोडेसे बाटलीच्या तोंडाकडे काळसर दिसू लागले, त्यामुळे विक्री होईनाशी झाली. मग हेन्रीने त्यावर उपाय शोधून काढला. त्याने बाटलीच्या तोंडालाच लेबल्स लावायला सुरुवात केली. अडचण आली तर त्यातून मार्ग शोधता येतो, हे त्याने आपल्या मनाशी पक्के गिरवले होते. याचेच पुढे केचप बनले. (Business)

ही पाककृती हेन्रीच्या आईने पारंपरिक पद्धतीने आत्मसात केलेली होती. आजही जगभर हीच पाककृती केचपची म्हणून ओळखली जाते. हेन्रीने पुन्हा मेहनत करून आपला व्यवसाय मोठा केला आणि हाईंझ केचपचे साम्राज्य विस्तारत राहिले. गुणवत्ता आणि मेहनत या दोन्ही गुणांच्या जोरावर हेन्रीने आपले गमावलेले साम्राज्य पुन्हा उभे केले. केचपपासून केलेली ती सुरुवात आणि आज साडेपाच हजारांहून अधिक वेगवेगळी उत्पादने हाईंझ कंपनी तयार करते.

डॉ. प्रिया दंडगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT