Dattatray J linkedin user post showing singapore to mother for first time goes viral see photos  
Trending News

'आज मी माझ्या आईला जग दाखवलं...'; कलियुगातील श्रावण बाळाचं नेटिझन्सकडून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिल जीवाचं रान करतात, मुलं मोठी होतात परदेशात शिकायला जातात आणि घरी आई-वडील त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. हे चित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. पण यासोबतच आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव असणारे तरुण देखील समाजात आहेत. असंच एक उदाहण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे.

दत्तात्रय नावाच्या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होते आहे. हा मराठी मुलगा त्याच्या कधी विमानही न पाहिलेल्या आईला पहिल्यांदाच सिगांपूरला घेऊन गेला. दत्तात्रय यांनी या प्रवासाबद्दलच्या त्यांच्या भावना या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. या पोस्टचा अनुवाद बऱ्याच जणांनी फेसबुकवर देखील पोस्ट केला आहे.

पोस्टमध्ये काय लिहीलंय?

काल मी माझ्या आईला जगाचा हा सुंदर भाग दाखवण्यासाठी सिंगापूर येथे आणू शकलो आणि आजच मी तिला माझे कार्यालय आणि शहराचा परिसर दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचे ठरवलं. ती ज्या भावना आणि आनंद अनुभवत आहे ते व्यक्त करणे कठीण आहे.

कल्पना करा, ज्या महिलेने आपले संपूर्ण आयुष्य गावात घालवले आहे आणि तिने विमान अगदी जवळून पाहिले नाही. होय, ती परदेशात प्रवास करणारी तिच्या पिढीतील पहिली आणि माझ्या गावातील दुसरी महिला (अर्थातच पहिली माझी पत्नी आहे).

माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप खास क्षण. मला दुखावणारी एकच गोष्ट आहे - माझ्या वडिलांनी हे अनुभवायला हवं होतं! मी खरोखरच प्रवास केलेल्या/प्रवास करत असलेल्या लोकांना विनंती करतो तुम्ही प्रवास करत असलेल्या कालावधीची पर्वा न करता, तुमच्या पालकांना जगाचा इतर सुंदर भाग दाखवा.

माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांचा आनंद मोजता येण्यापलीकडे असतो. सिंगापूरला जाण्यापूर्वीच मी माझ्या आईला घेऊन येणार हे ठरवलं होतं, मी प्रवास करण्यापूर्वीच हे माझं ध्येय होतं.

सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव

या पोस्टनंतर सोशल मीडियावर या तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. लोक भरभरून शुभेच्छा देत आहेत आणि अभिनंदन करत आहेत. खरा सुपुत्र शोभावा, अशी भावना प्रत्येक मुलांनी ठेवावी तसेच खूपचं छान वाटल.आजही अशी मुलं आहेत ज्याना आईविषयी प्रेम वाटतं याचा आनंद झाल्याच्या कमेंट शेकडो लोकांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT